विजेच्या धक्क्याने आठ म्हशींचा मृत्यू, महावितरण वायरमनचा हलगर्जीपणा

वाहता वीज प्रवाह असलेली तार तुटून एका गोठ्यावर पडल्याने शॉर्ट सर्किट होऊन आठ गाभण म्हशी दगावल्याची घटना रविवारी (दि. १८) घडली. या घटनेत महावितरणच्या एका वायरमनचा हलगर्जीपणा समोर आला आहे. eight buffaloes dead panchavati cowshed MSEDCL wireman disregard nashik news

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत मात्र मुक्या प्राण्याचा जीव जाण्या बरोबरच व्यावसायिकाचे हकनाक १२ लाखांचे नुकसान झाले आहे.

घडलेली घटना अशी की, औरंगाबाद रोडवरील नीलगिरी बागेलगत साहेबराव शंकरराव लोहोट यांचा गायी व म्हशींचा गोठा आहे. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास कामगार गोठ्यातील जनावरांना नियमितपणे चारापाणी देत होते. याच सुमारास गोठ्यात मागील बाजूस असलेल्या म्हशी अचानक मोठ्याने ओरडू लागल्या.

गोठ्याबाहेर असलेले कैलास रहाटकर यांनी बघितले त्यावेळी वरून गेलेल्या विद्युत तारेत शॉर्टसर्किट होऊन मोठ्या ठिणग्या उडताना दिसल्या. त्यामुळे सावध झालेल्या विलास यांनी तत्काळ वीजप्रवाह खंडित करण्यासाठी धाव घेतली.

मात्र, तोपर्यंत गोठ्यातील आठ गाभण म्हशींना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. परंतु, १२ लाखांच्या वर आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान गोठ्यावरून विद्युत तर नेण्यास विरोध केला असूनही महावितरणच्या वायरमन यांनी गोठ्यावरून तार टाकली. गोठ्याला लोखंडी पत्रे असल्यामुळे शॉर्ट सर्किट मुले प्रवाह म्हशींपर्यंत आल्याचा आरोप करत गोठ्याचे मालक साहेबराव लोहोट यांनी करत कर्मचाऱ्याचा गलथानपणा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. eight buffaloes dead panchavati cowshed MSEDCL wireman disregard nashik news

सुदैव म्हणा की काय, परंतु या दगावलेल्या आठ म्हशीनंतर एक म्हशीची जागा रिकामी असल्याने त्या पुढे एका ओळीत बांधलेल्या ५० म्हशींचे प्राण वाचले आहेत. ती एक जागा रिकामी असती तर नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असते. कदाचित मनुष्य हानीही होऊ शकली असती.

घटनेची माहिती घेत पंचनामा करीत आडगाव पोलिसांनी मृत पावलेल्या म्हशी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

eight buffaloes dead panchavati cowshed MSEDCL wireman disregard nashik news

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.