आर्थिक घोटाळा आणि त्याची व्याप्ती पाहता तसेच योग्य दिशेने करता यावा आणि अनेक तथ्य समोर यावेत या साठी आता Enforcement Directorate अर्थात ईडी ने फडणीस घोटाळ्याची चौकशी सुरु केली आहे. तर नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून याबाबत सर्व माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे इतर आर्थिक घोटाळे त्यांची चौकशी सुद्धा ईडी करू शकेल असे चित्र आहे.
नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने काल (21 एप्रिल) मुंबईतील विक्रोळीतून फडणीस ग्रुप चा सर्वे सर्वा विनय फडणीस अटक केली. कोर्टाने विनय फडणीसला 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. विनय फडणीस आणि फडणीस ग्रुपवर आजपर्यंत नाशिकमध्ये फसवणुकीचे एकूण 5 गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे नाशिक शहरातूनच फडणीस ग्रुपविरोधात तब्बल 275 तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या असून त्यानुसार आतापर्यत जवळपास 11 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले आहे. तर फडणीस ग्रुप हा मुळचा पुणे स्थित ग्रुप आहे.फडणीस ग्रुपचे महाराष्ट्रातच 8000 च्या आसपास गुंतवणूकदार असून नाशिकमध्येच 2500 गुंतवणूकदार आहेत. एकूण तब्बल 300 कोटींचा हा घोटाळा असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.पुण्यातील एक मोठ प्रस्थ म्हणून विनय फडणीस यांची ओळख असून बांधकाम, हॉटेल, रिअल इस्टेट मध्ये ते कार्यरत आहेत. तर अनेक लोकांना त्याने मोठा परतावा देतो असे भासवून कोट्यावधीची फसवणूक केली आहे.