ylliX - Online Advertising Network

भुजबळ यांच्या फार्मवर कारवाई

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या मालकीच्या नाशिक येथील   भुजबळ फार्मवर मुल्यांकन करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई सुरु केली आहे.  भुजबळ कुटुंबियांचे अधिकृत निवासस्थान  आहे .   आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास  पाच वाहनांतून अधिकाऱ्यांची पथके भुजबळ फार्म असणाऱ्या गोविंदनगरमध्ये दाखल झाली आहे.

पथकांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश  आहे. भुजबळ फार्ममध्ये तीन बंगले, भुजबळ यांचे कार्यालय आणि मुख्य हवेलीचा समावेश आहे. यापैकी किती मालमत्ता चौकशीअंती ताब्यात घेण्यात येणार याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही.सध्या या अधिकाऱ्यांकडून भुजबळ फार्ममधील मालमत्तेचे मोजमाप आणि मुल्यांकन केले जात आहे. याठिकाणी भुजबळ यांचे निकटवर्तीय आणि वकीलही उपस्थित  आहे.

या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.  गेल्याच आठवड्यात ईडीने छगन भुजबळ यांच्या व कुटुंबीयांच्या मालकीच्या आणखी २२ मालमत्ता जप्त केल्या होत्या. आतापर्यंत भुजबळांच्या ४३३ कोटी रूपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

 

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.