ylliX - Online Advertising Network

शरद पवार ईडी नोटीस नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निर्दशने

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर युती सरकारने सुडातून गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांबरोबर राजकीय सुडातून शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याच्या आरोपावरून नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  निर्दशने करण्यात आली.

खा. शरद पवार यांच्यावर युती सरकारने सुडातून गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ  निर्दशने करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजी आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, नानासाहेब महाले, देविदास पिंगळे, अर्जुन टिळे, अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे आदी दिसत आहेत.


राज्य सहकारी बँकेचे शरद पवार हे कधीही संचालक देखील नव्हते. तसेच ते राज्यातील इतर कुठल्याही सरकारी बँकेमध्ये संचालक अथवा बँक प्रशासनाच्या निर्णय प्रक्रीयेमध्ये देखील सहभागी नव्हते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे महाराष्ट्र राज्यात फिरत आहेत. त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्यानेच ईडीच्या अडून सरकारने हा गुन्हा दाखल केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधारी सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी बोलतांना केला. यावेळी आंदोलकांकडून सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.