भल्या पहाटे दरोड्याच्या पैश्यावरुन चोरांमध्ये वादातून  गोळीबार, एक जखमी

नाशिक (मनमाड) : बेईमानीचा धंद्यात सुद्धा इमानदारी असते असे चोरांमध्ये म्हटले जाते, मात्र जेव्हा प्रश्न पैश्याचा येतो तेव्हा मात्र सर्व बाजूला राहते, असाच प्रकार मनमाड येथे पहाटे घडला आहे. दरोडेखोरांनी धुळे येथे डेरीवर दरोडा टाकला होता, तेथून फरार होत आरोपींमध्ये आपापसात झालेल्या पैसे वाटपाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मनमाड येथील भगतिसंग मैदानात घडली आहे. हा सर्व प्रकार  पहाटे तीन वाजता घडला असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. early morning thief gun shot money distribution problem one injured 

मुळचे मनमाड येथील चोर धुळे येथे एक डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या होते. चोरी करून मनमाड येथे आले तेव्हा दरोडेखोरांमध्ये चोरीचा मुद्देमाल वाटणी वरून आपापसात मोठा वाद झाला. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने सागर मरसाळे, गणेश मरसाळे यांनी त्यांचा जोडीदार गुरू भालेराव याच्यावर गोळी झाडली आहे. या दरोड्यातील आरोपी मनमाड येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने धुळे येथील पोलीस या आरोपींच्या मागावर होते. early morning thief gun shot money distribution problem one injured 

गोळीबाराची घटना घडल्यानंतर लगेचच धुळे पोलिसांनी जखमी भालेराव व सागरला ताब्यात घेतले आहे. तर तिसरा आरोपी फरार आहे. दोन्ही आरोपींना पोलिस धुळे येथे घेऊन गेले आहेत. गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या आरोपींवर धुळे जिल्हा रुग्णालयात येथे उपचार सुरू आहेत. जखमी आरोपीच्या फिर्यादीवरून मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Join Us On WhatsApp : https://chat.whatsapp.com/8Y4rF0ioa954F7uoqTrh3H

early morning thief gun shot money distribution problem one injured
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.