नाशिक : बँके पेक्षा अधिक आर्थिक परतावा देणार असे आमिष दाखवत अनेक गुंतवणुकदारांची फसवणूक झाल्याचे पुन्हा उघड झाले आहे. यावेळी गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाले असून इंदिरानगर पोलिसांनी ई शॉपीच्या सात संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़.E-shopping mall drowned billions rupees cheated.Nashikkar attracted much interest

पोलिसांनी कारवाई सुरु करताच संचालक फरार झाले आहेत. तर इंदिरानगर पोलीस ठाण्यात अनेक नवीन तक्रारदार पुढे येत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ई शॉपी मॉलला कुलूप लावण्यात आले आहे़. कोट्यावधी रुपयांचा प्रश्न असल्याने पोलिसांच्या आर्थिक शाखेने संचालकांची माहिती जमा करण्याचे व शोध घेण्याचे काम सुरू केले आहे़. पुन्हा एकदा नाशिकचे नागरिक फसवणुकीला बळी पडले आहे. मिरजकर त्रिशा, के.बी.सी., मैत्रेय अशी उदाहरणे ताजी असतांना पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला आहे.E-shopping mall drowned billions rupees cheated.Nashikkar attracted much interest
सविस्तर वृत्त असे की, सुशील पाटील (गंगापूर रोड. दादोजी कोंडदेव नगर, लिरील हार्ट सोसायटी) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ८ फेबु्रवारी २०१८ ते २० आॅगस्ट २०१८ कालावधीत संशयित संचालक मुकेश पाटील, ज्ञानेश्वर सीताराम पाटील, सुधाकर घोटेकर, सागर नांद्रे, दिनेश बावीस्कर, रवी त्रिपाठी , जफर यांनी संगनमत करून ई शॉपी ट्रेड कंपनी स्थापन केली होती.E-shopping mall drowned billions rupees cheated.Nashikkar attracted much interest
घोटी टोल नाका :अपघातात तरुणाचा मृत्यू, सर्वपक्षीय आंदोलन करत टोलनाका केला बंद
इंदिरानगरमधील बापू बंगल्याशेजारील कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. या द्वारे बँकेपेक्षा जास्त लाभाचे अमिष दाखविले़ होते. या अमिषाला बळी पडत पाटील यांनी ई शॉपीमध्ये १२ लाख ५३ हजार ६०० रुपयांची गुंतवणू केले होते. संचालकांनी पाटील यांनी गुंतवलेली रक्कम व त्यावरील लाभांश न देता या रकमेचा अपहार करून फसवणूक केली आहे.E-shopping mall drowned billions rupees cheated.Nashikkar attracted much interest
अनैतिक सबंध : जेलरोड परिसरात एकाचा खून, आरोपीस अटक
ई ट्रेड शॉपीच्या संचालकांनी नाशिक सोबतच धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचीही फसवणूक देखील केली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने ई शॉपी मॉल सील केला असून तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे़. पोलिसांनी इतर जिल्ह्यात कोठे कोठे कार्यालये आहेत त्याची चौकशी सुरु केली असून, तक्रारदारांनी इंदिरानगर येथे संपर्क साधावा असे आवाहन देखील केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आर्मी परिसरात तोफगोळ्याचा स्फोट: एक ठार, चार गंभीर जखमी
घशात अडकले खेकड्याचे कवच, दुर्बिण शस्त्रक्रिया करून काढले बाहेर
भारतरत्न वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन, दि.24 ऑगस्टला रामकुंडात विसर्जन
लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 22 ऑगस्ट 2018