ylliX - Online Advertising Network

dwarka circle द्वारका सर्कलकडे आता अवजड वाहने व प्रवासी वाहतूक बंद अधिसूचना प्रसिद्ध

मुंबई आग्रा उडाणपूला वरून नाशिक शहरात अवजड वाहने व प्रवाशी वाहतूक करणारे बसेस यांना प्रवेश बंद तसेच पुणे कडून धुळे, मुंबई कडे जाणारे व येणाऱ्या अवजड वाहने व प्रवाशी वाहतूक करणारे बसेस यांना द्वारका सर्कल कडे ये जा करणेस प्रवेश बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणे बाबत वाहतूक अधिसूचना काढली आहे dwarka circle

रका सर्कल येथील वाहतूक सुरळीत, सुव्यवस्थित व वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरीताकरण्याकरीता मा. पोलीस आयुक्त साो. विश्वास नांगरे-पाटील, मा.पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक)पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहा.पोलीस आयुक्त मंगलसिंग बी.सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली आमजनतेच्या सोयीकरीता द्वारका सर्कल येथे करावयाच्या कारवायांपैकी एक कारवाई करण्यात येत आहे. त्यापैकी सर्विसरोड वरीलवाहतूक एकेरी करण्यात आलेली आहे., संगमनेर,सिन्नर बाजुकडून द्वारका सर्कल कडे येणारी भाजीपाल्याची वाहनेफेम सिग्नल कडून वळविण्यात आलेली आहे. तसेच पुढील टण्यात नाशिक महानगर पालिकेकडून अद्यावतसिग्नल यंत्रणा मंजूर करणे, बस थांबे हलविणे बाबत उपाययोजना राबविण्यात येणार आहे.dwarka circle
द्वारका सर्कल येथे एकूण १७ रस्ते एकत्र येत असल्याने अवजड वाहने व खाजगी प्रवासी वाहतूककरणा-या बसेस मुळे वाहतूक कोंडी होवून गंभीर स्वरूपाचे अपघात देखील झालेले आहेत. तसेच सदर ठिकाणीशाळा, मोठया आस्थापना यामुळे होणारी वाहतूक सुरळीत करणेसाठी त्वरीत कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणेउपाययोजना करण्यात येत आहे.


___शहरातील खालील नमूद मार्गावर सकाळी ०८:०० ते रात्री १०:००
वाजेपावेतो ” सर्व प्रकारच्या जड वअवजड वाहने व खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या बसेस यांना ” प्रवेशबंद करण्यात येत आहे.
१. मुंबई-आग्रा रोड वरील उड्डाणपुलावरून रॅम्पने खाली उतरून तसेच राष्ट्रीय महामार्गावरून शहरातदिलेल्या एन्ट्री पॉईट- के.के.वाघ कॉलेज जवळ, द्वारका सर्कल, इंदिरानगर अंडरपास, स्प्लेंडर हॉल, गरवारे टीपॉईंट जवळ शहरात जड अवजड वाहनांना व खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या बसेस यांना प्रवेश करण्यासमनाई करण्यात येत असुन सदरचे सर्व मार्ग नमूद वेळेकरीता ” प्रवेश बंद ” म्हणुन घोषित करण्यात येत आहे.
२. पुणे, संगमनेर,सिन्नर मार्गाकडून नाशिक शहराकडे येणा-या व जाणा-या सर्व प्रकारच्या जड अवजडवाहनांना व खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या बसेस यांना द्वारका चौक मार्गाचा अवलंब करण्यास मनाईकरण्यात येत येत असुन सदरचे सर्व मार्ग नमूद वेळेकरीता ” प्रवेश बंद ” म्हणुन घोषित करण्यात येत आहे
पर्यायी मार्ग- फेम सिग्नल, उजवीकडे वळून -रामदास स्वामी मार्गे, जेजुरकरमळा, मिर्ची हॉटेल सिग्नलऔरंगाबादरोड- अमृतधाम चौक तेथून धुळे व इतरत्र जातील व येतील
मुंबई बाजुकडे जाण्या व येण्यासाठी फेम सिग्नल डावीकडे वळुन – श्रीश्री रविशंकर मार्गे- वडाळापाथर्डीरोडने. पाथर्डीगाव सर्कल- पाथर्डीफाटा- सव्हिसरोडने मुंबई कडे जातील
व्यापारी बाजारपेठ, बांधकाम व्यवसायाची ठिकाणे यासारखी तत्सम व्यवसायाचे ठिकाणी जड/अवजडवाहनाद्वारे मालाची चढउतार करण्यासाठी येणारी वाहने ही संबधीतानी दररोज रात्री १०:०० वाजेनंतर ते सकाळी०८:०० वाजेपुर्वी सदरची वाहने शहरात दाखल करावीत. दिवसा शहराच्या बाहेरील ठिकाणी मालाची चढउतारकरण्यासाठी छोटया वाहनांद्वारे मालाची चढउतार करावी.
सदरची अधिसुचना बाबत नागरीकांच्या काही तकारी व मार्गदर्शनपर सुचना असल्यास तसे लेखीस्वरूपात मा.सहा.पोलीस आयुक्त, शहर वाहतूक विभाग, जुने पोलीस आयुक्त कार्यालय, शरणपूर गंगापूरलिंकरोड या कार्यालयास ३० दिवसाच्या आत कळविण्यात याव्यात. सदर भागातील स्थानिक नागरीक,व्यावसायीक ,इतरांनी याची नोंद घ्यावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती. dwarka circle

सदरील अधिसुचना दिनांक 3 /2 /२०२० पासुन अंमलात येणार असुन याबाबत पुढील अधिसूचनानिर्गमित करण्यापावेतो सदरील अधिसुचना कायम अस्तित्वात राहील. तरी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्वनागरिकानी याबाबत नोंद घ्यावी. सदरील अधिसूचनेचे उल्लंघन करणा-यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८मधील कलम ११९/१७७, १२२/१७७ प्रमाणे व अन्य कायदयातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यातयेईल यांची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी.
सदरील अधिसुचना दिनांक ही माझ्या सही व शिक्यानिशी दिनांक १/2/२०२० रोजी निर्गमित पोलिस

पोलिस आयुक्त

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.