नाशिक : दुर्गसंवर्धन इतिहास घडवण्याचे कार्य आहे. या कार्याला उपासना समजून कार्यरत असणाऱ्या श्रमिक दुर्गसंवर्धक कार्याला ३१ गुण आवश्यक आहेत. या गुणाची साधना आचरणात आणल्यात हे कार्य जागतिक पातळीचे कार्य होईल. यासाठी आता कृतीत आणण्याचे सत्कर्म करू या असे असे आवाहन पर निरुपण व्याख्यान (दि. १५ मार्च) डॉ. संदीप भानोसे यांनी दुर्गजागृती व्याख्यानमालेच्या १३व्या पुष्पात व्यक्त केले. तिथीनुसार साजऱ्या झालेल्या शिवरायांच्या जयंतीवेळी हे व्याख्यान झाले. छत्रपती शिवराय त्याग, विनम्रता, कर्तव्य, संघटन, व्यवस्थापन, शौर्य, पराक्रम आणि सेवाभाव याचे मूर्तिमंत रूप होते. त्यांनी रयतेच्या स्वराज्यासाठी केलेले कार्य आज गडकिल्ल्यांच्या रूपाने आपल्यासमोर आहे, या दुर्गांचे हाल,सामाजिक ,राजकीय दुर्लक्ष बघता हे गडकोट संवर्धनाचे कार्य आपुले जीव कि प्राण समजून यासाठी समर्पित भावनेनी कार्यरत व्हा, असे आवाहनही डॉ. भानोसे यांनी केले.
यावेळी प्रसंगी ‘ दुर्गसंवर्धकांची गरुडझेप ‘ या विषयावर डॉ. भानोसे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हूदलिकर होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या हातून किल्ले संवर्धन कार्यातील महिला दुर्गसंवर्धक ललिताताई गोवर्धने यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असा ‘ गडमित्र ‘ पुरस्कार देण्यात आला.
डॉ. भानोसे यांनी सांगितलेले हेच ते ३१ गुण – दुर्गसंवर्धनाच्या ध्येयप्राप्तीसाठी – उत्तम नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, दृढ़ता, नम्रता, अभ्यासूवृत्ती सत्कर्म, शांतता, एकाग्रता, निरिक्षण क्षमता, संकल्प, ध्येयनिश्चिती, वेळेचे भान, कृतिशीलता, दूरदृष्टी,
हे गुण अंगिकारले त्याचबरोबर या गुणांचे आचरण केले तर दुर्गसंवर्धक ध्येय गाठू शकतातत. डॉ. भानोसे यांनी यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओवी, समर्थ रामदास स्वामीच्या दासबोध ग्रंथ ,विनोबाजी भावे यांच्या विचाराचे अनेक दाखले दिले. दुर्गांचे स्वरचित काव्य ही अखेरीस त्यानी सादर केले. यावेळी जेष्ट स्वातंत्र्यसैनिक वसंत हुद्लिकर,दुर्गलेखक सुदर्शन कुलथे,हरित नाशिकचे निशिकांत पगारे,शेतकरी अभियानचे प्रकाश चव्हान,नेचर कल्बचे आनंद बोरा,दुर्गमित्र ललिताताई गोवर्धने,महेंद्र काका कुलकर्णी,शिवकार्य गड्कोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,मुख्य संयोजक योगेश कापसे,प्रा..सोमनाथ मुठाळ,पुरातन वस्तु संग्राहक कचरू वैद्य,सल्लागार समितीचे डॉ.अजय कापडनिस, भीमराव राजोले,यशवंत धांडे,आर आर कुलकर्णी,हरी पवार,सांस्कृतिक मंच चे शिवकलावंत संकेत नेवकर,बालशाहिर करण मुसले,रेनू भानोसे,संकेत भानोसे,निलेश ठुबे,मनोज अहिरे,प्रशांत लोनारी,एच.एस.भावसार,नंदकुमार कापसे,सचिन बरेलीकार,लहू मोरे,शांताराम वारुन्घसे,दिनेश पाटिल,धनंजय जोशी,प्रमोद चव्हाण, यासह अनेक श्रोते उपस्थित होते.

आतिशय उत्तम वृत्तांकन ….खूप छान अनुभव !!