पाथर्डी फाटा :साल्याने केला दाजीचा खून
जावयाने प्रापर्टीच्या वाद झाला तेव्हा रागाच्या भरात सासूवर हात उचलला याचा राग आल्याने जावयाच्या डोक्यात संतप्त झालेल्या साल्याने फावड्याच्या दांडका घातला आहे. हा वार इतका वर्मी लागला की जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारच्या सुमारास पाथर्डी परिसरात घडली आहे. यामध्ये शशिकांत बाळू खुर्दळ (रा. खतवड, ता़ दिंडोरी) असे मृत्यू झालेल्या जावयाचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी सासू, मारहाण करणाऱ्या शालकास ताब्यात घेतले आहे़.
सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथील पाथर्डी फाट्यावरील विक्रीकर भवनजवळ असलेल्या तुळशीराम रो-हाउसमध्ये सुनंदा आनंदा मगर या मुलगा सुनील सोबत राहत आहेत. आज शुक्रवारी दुपारी १ वाजता सुनंदाबाई यांच्या मुलीचा पती अर्थात त्यांचा जावई शशिकांत बाळू खुर्दळ सासुरवाडीला आला, घरी आल्यावर थोड्या वेळातच सासू सुनंदा, जावई शशिकांत यांच्यामध्ये प्रॉपर्टीच्या विषयावरून जोरदार वाद सुरू झाला़. हे सर्व प्रकरण जवळपास सुमारे दोन तास सुरु होता. वाद इतका विकोपाला गेला की जावई शशिकांत याने सासू सुनंदा यांना मारले होते. त्यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेला सुनंदा यांचा मुलगा व मयत खुर्दळ यांचा साला सुनील याला भयानक राग आला त्याने लगेच घरातील फावड्याचा दांडा उलचून दाजी शशिकांतच्या डोक्यात घातला. वार वर्मी लागला आणि शशिकांतचा जागीच मृत्यू झाला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी पडलेल्या शशिकांत यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाल नेला होता. इंदिरानगर पोलिसांनी सासू सुनंदा मगर व शालक सुनील मगर या दोघांना ताब्यात घेतले आहे.