रोजच्या धावपळीच्या जगण्यामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. या बदलांमुळे मधुमेह आणि वजनामध्ये मोठी वाढ या दोन आरोग्यविषयक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. नेमक्या याच समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेडकडून सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जीवनशैली बदलातून स्थूलत्व व मधुमेह मुक्ती याविषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे व्याख्यान संपन्न होणार आहे. सदरचे व्याख्यान सर्वासाठी खुले आणि मोफत स्वरूपाचे आहे. dr Jagannath Dixit
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेडकडून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. हीच परंपरा कायम ठेवत नागरिकाच्या आरोग्य संवर्धन आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन या हेतूने डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह विकार होणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. अनेकजण याकडे पुरेसे लक्ष देत नाही. यातूनच पुढे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. सोबतच वजन कमी करण्यासाठी ऐकीव गोष्टींचा अवलंब केला जातो. हे सर्व रोखण्यासाठी ‘दीक्षित जीवनशैली‘ अर्थात ‘दीक्षित पॅटर्न’ चा अवलंब केल्यानंतर अनेकांना त्याचा लाभ झाला आहे. हीच या जीवनशैली लोकांपर्यंत पोहोचवणारे डॉ. दीक्षित स्व:ता मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. दीक्षित यांनी स्थापन केलेल्या असोसिएशन फॉर डायबेटिस आणि ओबेसिटी रिव्हरसल अर्थात अडोर ट्रस्टतर्फे भारतात १४ शहरात मधुमेह मुक्ती केंद्रे सुरु असून यातून हजारो रुग्णांना सेवा दिली जात आहे. दीक्षित यांचे हे कार्य बघूनच नाशिककरांनाही याचा लाभ व्हावा या उद्देशाने सदरचे व्याख्यान संपन्न होत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तरी या व्याख्यानाचा लाभ नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन लोकमान्यकडून करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये गेल्या ९ वर्षांपासून लोकमान्य सोसायटी कार्यरत आहेत. लोकमान्यकडून वेगेवगळ्या सुरक्षित ठेव योजना, विमा, बचत खाते, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक,विविध प्रकारचे कर्ज आदी सेवा दिल्या जातात. शहरातील नवीन सिडको, सावरकरनगर, इंदिरानगर, नाशिकरोड आणि जळगाव येथे शाखा आहेत. सोबतच विभागीय कार्यालय देखील आहे. आणि त्याच इमारतीमध्ये मेरीगोल्ड हा बँक्वेट हॉल असून यामार्फत नाशिककरांना सेवा दिली जाते.