पंचवटी : डोण्या मोकळ खून प्रकरण ; तिघा मारेकऱ्यांना जन्मठेप

डोण्या मोकळ खून प्रकरण : तिघा मारेकऱ्यांना जन्मठेप

नाशिक :नाशिक मध्ये टोळी युद्ध सुरु आहेत असे चित्र तरी आहेत. खून का बदला खून सुरु आहे. यामध्ये पंचवटी परिसरातील सराईत गुंड सचिन उर्फ डोण्या रावसाहेब मोकळ (३२, गणेशवाडी ) याची हत्या केली प्रकरणी न्यायालयाने तिघांना दोषी ठरवेल आहे. या प्रकरणी योगेश गांगुर्डे (सातूपर), प्रितम चांगले (ग़णेशवाडी, पंचवटी), व सागर खैरनार (मखमलाबाद नाका, पंचवटी) यांना जन्मठेप सुनावली आहे.

खुनाचा तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी केला आहे. सरकारी बाजूने  वकील प्रमोद पाटील यांनी काम पाहिले़ आहे.

प्रकरण असे की गणेशवाडी परिसरातील ५ जानेवारी २०१४ रोजी ५ जानेवारी २०१४ रोजी दुपारी आरोपी योगेश गांगुर्डे, प्रितम चांगले व सागर खैरनार हे तिघे इंडिका कारमधून आले़ त्यांनी सचिन उर्फ डोण्या मोकळ यास फोन केला आणि बोलवले होते. त्यांची भेट झाल्यावर अपेक्षित असा वाद सुरु झाला होता. यावेळी तिघांनी आधीच ठरवल्या प्रमाणे तिघांनी चॉपर, चाकू व कोयत्याने मोकळवर वार केले़ होते. यामध्ये मोकळ जखमी झाला होता.

उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आदेश पवार यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़शर्मा यांच्या न्यायालयात हा खटला सुरु होता़. साक्षीदार आणि इतर पुरावे तपासले आणि या तिघांना दोषी धरत निकाल दिला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.