ylliX - Online Advertising Network

पिसाळलेल्या कुत्र्याने  हल्ला करत घेतला बालकाचा जीव

हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली आहे dog bite small boy died attack sinner mother injured 

नाशिक : पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत जबर चावा घेऊन एका दोन वर्षीय  लहान बालकाला ठार केले आहे. ही घटना सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा शिवारातील वीटभट्टीवर घडली आहे.  यामध्ये बाळाला वाचवत असलेल्या मातेवरही या कुत्र्याने हल्ला केला होता. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यामुळे भटके कुत्रे यांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.dog bite small boy died attack sinner mother injured 

नाशिक पासून जवळ असलेल्या सिन्नर येथे  वडगाव परिसरातील कारखाना रोडवरील एका वीटभट्टीवर पवार दाम्पत्य काम करीत आहे. ऋषी पवार आणि त्यांची पत्नी जनाबाई पवार हे वीटभट्टीवर काम करीत असताना त्यांनी आपले एक वर्षीय बाळ कांचन याला झाडाला बांधलेल्या झोळीत झोपविले होते. ते सर्व कामात व्यग्र होते. मात्र याचवेळी आई जनाबाई यांना जोरात बाळाचा रडण्याचा आवाज आला, त्यानी पाहिले की कुत्र्याने बाळावर हल्ला केला असून त्याचा लचका तोडत आहे. आईने या कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्याचा जोरदार प्रयत्न केला, त्या कुत्र्याने आईवर हल्ला केला. कुत्र्याला मारले तेव्हा त्याने पळ काढला. जखमी बाळ मात्र आईच्या कुशीत मृत झाले होते.

लोक मदतीला धावले आणि त्यांनी आई आणि बाळ या दोघांनाही नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.बिबट्यांची भीती, आता कुत्र्यांची दहशतशहरालगतच्या शेती आणि मळे परिसरात बिबट्यांचा संचार असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.  भगूर, लहवित, नाणेगाव परिसर असो की शिंदे, पळसे, पंचवटी परिसरातील मळे तसेच पाटाचा परिसर, सातपूर जवळच्या पिंपळगाव खांब असे शहराच्या चारही बाजूला बिबट्याचे वास्तव्य आहे. तर आता या भटक्या कुत्र्यांचा त्रास सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वी कांचन या बालिकेवर कुत्र्याने हल्ला केला होता. मात्र नगर पालिका अजूनही कुत्र नियंत्रण करताना दिसत नाही.

*********************************************************************

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा  तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.