डॉक्टर देवदूत : मुलीने गिळलेले २ रुपयाचे नाणे,शस्त्रक्रिया करत वाचवले प्राण

५ वर्षाच्या मुलीने गिळलेले २ रुपयाचे नाणे, केली यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया

नाशिक :नाकातून स्वशन नलिकेत हरबरा दाणा अडकून एका बालकाचा मृत्यू झाला होता. तर १० रुपयांचा नाणे गिळत एका चिमुरडीने प्राण गमावले होते. मात्र वैष्णवीचे भाग्य बलवत्तर तिला योग्य वेळेत उपचार आणि चांगले डॉक्टर मिळाले.  नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५ वर्षाच्या मुलीने गिळलेले २ रुपयांचे नाणे यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात आले आहे. वैष्णवी माळी असे चिमुरडीचे नाव असून ती मनमाड शहरात राहते. या चिमुकलीच्या पालकांनी तात्काळ तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर लगेचच शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवण्यात आला.doctor operated girl successfully swallow two rupees coin nashik today  

Coin
५ वर्षाच्या मुलीने गिळलेले २ रुपयांचे नाणे यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात आले आहे

या घटनेमध्ये वैष्णवी एका दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी चॉकलेट घेतल्यानंतर खेळताखेळता तिने हातात असलेले २ रुपयांचे नाणे गिळले. ही बाब लगेचच दुकानदाराच्या लक्षात आली.  त्या दुकानदाराने तातडीने या घटनेची माहिती वैष्णवीच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर तात्काळ  तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करत तिच्या गळ्यात अडकलेले नाणे बाहेर काढण्यात आले.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.