गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरला शिक्षा मालेगाव येथील देवरे डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द
नाशिक : मालेगावमध्ये गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टर अभिजित देवरे यांना ३ वर्षे कारावास व ७ हजार रुपये दंड, तर डॉ. सुमीत देवरे यांना ६ महिने कारावास आणि ७ हजार रुपये दंड, तसेच वैद्यकीय परवाना रद्द करण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. संबंधित डॉक्टर सीताबाई हॉस्पिटलच्या माध्यमातून शिवमंगल सोनोग्राफी केंद्रात अवैध गर्भलिंग निदान करत असल्याचे सिद्ध झाले होते. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर पोलिस व प्रशासनाने स्टिंग ऑपरेशन करून २० जुलै १३ ला हा गुन्हा उघडकीस आणला होता. त्यानंतर संशयितांवर खटला चालून त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली.