ylliX - Online Advertising Network

रोख हातात ठेवा सहा दिवस बँका बंद असणार आहेत

दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळीचा बोनसही अनेकांना आला आहे. खरेदीला वेग आला आहे. अशातच अनेकांची बँकांची कामे, व्यवहारही आहेत. दिवाळी असल्याने जवळपास सहा दिवस बँका बंद असणार आहेत. यामुळे तुमच्या हातात आजचाच दिवस आहे. उद्यापासून बँकांना सुट्ट्या सुरु होत आहेत. त्यामुळे कोणीही atm मध्ये पैसे भरणार नाही. diwali bank holidays

धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीजसह काही दिवस बँका बंद असणार आहेत. यात पुढचा अख्खा आठवडा जाणार आहे. ऱिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानुसार देशभरातील बँका पुढील सहा दिवस बंद असणरा आहेत. काही सुट्ट्या या राष्ट्रीय स्तरावरील आहेत. तर काही सुट्ट्या या त्या त्या भागातील सणांनुसार आहेत. यामध्ये काही राज्यांमध्येच बँकेच्या शाखा बंद असतात.
बँकांच्या सेवा ऑनलाईन सुरु असल्य़ा तरी छोटे-मोठे व्यापारी, बँकांचे हप्ते भरणारे आदींची कामे ही बँकेत जाऊनच करावी लागतात. याचबरोबर बँकांची अन्य कामे देखील करण्यासाठी बँकेत जावे लागते.

diwali bank holidays
diwali bank holidays
  • 22 ऑक्टोबर : धनत्रयोदशीचा आहे. देशभरातील बँका बंद राहतील. या दिवशी महिन्याचा चौथा शनिवार देखील येतो.
  • 23 ऑक्टोबर : नरकचतुर्दशी, रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी आहे. देशभरातील बँकिंग कामकाज बंद राहणार आहे.
  • 24 ऑक्टोबर : लक्ष्मीपूजन – गंगटोक, हैदराबाद, इम्फाळ वगळता भारतभर बँका बंद राहतील.
  • 25 ऑक्टोबर: गंगटोक, हैदराबाद, इंफाळ, जयपूर येथे लक्ष्मी पूजा/दिवाळी/गोवर्धन पूजेमुळे बँका बंद राहतील.
  • 26 ऑक्टोबर: अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, देहरादून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, शिमला, गोवर्धन पूजा/विक्रम संवत नववर्ष दिनानिमित्त/भाऊबीज/दिवाळी/लक्ष्मीपूजा/प्रवेश श्रीनगरमध्ये दिवसभर बँका बंद राहतील.
  • 27 ऑक्टोबर: या दिवशी भाऊबीज/ चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दीपावली / निंगोल चक्कूबा उत्सव साजरा केला जाईल. त्यामुळे गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँका बंद राहतील.
  • diwali bank holidays
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.