गर्भपात प्रकरण : डॉ. वर्षा लहाडे विरोधात गुन्हा दाखल वाचा कोणते गुन्हे आहेत

नाशिक : नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील डॉ. वर्षा लहाडे यांच्या विरोधात महापालिका आरोग्य विभागाने सरकारची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली असून त्यानुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात डॉ. लहाडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. लहाडे यांच्याविरोधात फसवणूक, सरकारी कामात अडथळा आणणे, मुंबई नर्सिंग कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे मनपाचे वकिल शिरीष पारख यांनी माहिती दिली. यामध्ये म्हसरूळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भा.दं.वि क्र. ४६८,४७१,४२०,१७७,१९८,१८६, एम टी पी कायदा ४ व नियम ५औषधे सोदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या खालील नियम १९४५ मधील कलम १८ अ. १८ ए  सह वाचन शेड्युल के मधील मुद्दा क्रमांक पाच कलम २७ डी नुसार शिक्षेस पात्र मुंबई सुश्रुषा अधिनियमान कलम ३ चे उल्लघन ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
 
विनापरवाना खासगी रुग्णालय थाटून तसेच खोटे दस्तऐवज सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे यांच्याविरोधात मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सोबतच बेकायदेशीररित्या गर्भनिदान चाचणी केल्याचेही समोर आले. त्यामुळे मनपा वैद्यकीय अधिक्षक डॉ. डेकाटे यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात जाऊन डॉ. लहाडे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.