ylliX - Online Advertising Network

Hanuman’s birthplace हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद, महतांमध्ये जागेवरून भांडण

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये हनुमानाच्या जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी  शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत साधु-महंत आपापसात भांडतांना दिसले.  यावेळी  एका महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य यांचा  उल्लेख काँग्रेसी असा केल्यानंतर  वादाला सुरुवात झाली. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. याआधी  आसनव्यवस्थेवरुनही हे साधू-महंत भांडतांना पाहायला मिळाले. Hanuman’s birthplace
कर्नाटकातील किष्किंदा मठाधिपती महंत गोविंददास महाराज यांनी किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला. त्याचवेळी नाशिकच्या महंतांनी अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचं म्हटलंय. त्यावर महंत गोविंददास महाराज हे आपल्या दाव्यावर ठाम राहत त्यांनी नाशिकच्या साधू महंतांना आव्हान दिलं. ते शास्त्रार्थासाठी नाशिकमध्ये दाखलही झाले. मात्र, शास्त्रार्थ सभा सुरु होण्यापूर्वीच सभेतील आसनस्थळावरुन वाद रंगला. आसनव्यवस्थेमध्ये जेष्ठ-कनिष्ठतेनुसार काही महंतांचा अपमान होत असल्याचा आरोप करण्यात आला. महंत गोविंददास यांनी ज्येष्ठ महंतांच्या आसनावर बसू नये यावरुन वादाला सुरुवात झाली. त्यामुळे शास्त्रार्थ सभेत तणाव निर्माण झाला.
याशिवाय शास्त्रार्थ सभा सुरु झाल्यानंतर नाशिकमधील महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य यांचा काँग्रेसी असा उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला. इतकंच नाही तर महंत सुधीरदास महाराज यांनी महंत गोविंददास महाराज यांच्यावर माईकही उगारला. त्यानंतर मात्र, शास्त्रार्थ सभेत मोठा राडा पाहायला मिळाला. जगद्गुरुंचा अपमान केल्याप्रकरणी महंत सुधीरदास यांनी माफी मागावी अशी आक्रमक मागणी करण्यात आलीय. अखेर सभा रद्द करण्यात आली. Hanuman’s birthplace

A scientific meeting was organized in Nashik to resolve the dispute which started from Hanuman’s birthplace. However, in this meeting, sadhus and mahants were seen arguing among themselves. The controversy started when a mahant referred to Jagadguru Shankaracharya as a Congressman. An aggressive demand was made to apologize to Shankaracharya. Earlier, this sadhu-mahant quarrel was also seen from the seating arrangement.

Mahant Govinddas Maharaj, the abbot of Kishkinda in Karnataka, claimed that Kishkinda was the birthplace of Hanuman. At the same time, the mahants of Nashik said that Anjaneri was the birthplace of Hanuman. Mahant Govinddas Maharaj insisted on his claim and challenged the sadhu mahants of Nashik. He also entered Nashik for Shastrartha. However, before the Shastrartha Sabha started, a dispute arose from the meeting place. It was alleged that some of the mahants were being insulted due to their seniority and inferiority in the seating arrangement. The controversy started when Mahant Govinddas should not sit on the seat of senior mahant. This created tension in the scientific community.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.