ylliX - Online Advertising Network

स्थापत्यशास्त्रातील उदाहरण ठरणाऱ्या जगभरातील ११ प्रसिद्ध इमारतींचे अनोखे प्रदर्शन

जगातील स्थापत्यशास्त्रातील प्रसिद्ध इमारतींचे अनोखे प्रदर्शन, आयडिया कॉलेजचे ४ दिवसीय वार्षिक प्रदर्शन

नाशिक : जगात आतापर्यंत अनेक प्रकारची बांधकामे झाली आहे. यात आपल्या देशामधला आग्र्याचा ताजमहाल असो की ऑस्ट्रेलिया येथील ओपेरा हाऊस. या सर्व इमारती मानव इतिहासाच्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक अशाच मानल्या जातात. हेच ओळखून नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात आयडिया कॉलेज तर्फे जगातील अनोख्या इमारतींच्या बांधकामांचे प्रतिकृतीचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. सोबतच घरातील सजावट आणि इतर उपयोगी वस्तू या कशा प्रकारे निसर्ग देतो त्यांचा ही समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इफ्को, फिनोलेक्स पाईप आणि अपोलो पेट यांनी या प्रदर्शनाला अर्थसहाय्य केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयडिया कॉलेजचे विद्यार्थी अतिशय वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण कल्पनाचे सादरीकरण करत ‘क्रांती ते उत्क्रांती’ हा विषय घेऊन महाविद्यालयाचे वार्षिक प्रदर्शन अर्थात ‘एक्सक्लेम २०१७’ चे आयोजन करत आहे. सदरचे प्रदर्शन दिनांक १३ ते १६ एप्रिल २०१७  या कालावधीत कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड, नाशिक येथे भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक १३ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ११ वाजता श्री. जयेश शहा, संचालक फोकाय आर्ट गॅलरी,शाहानूर सिरामिक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर दिनांक १६ एप्रिल २०१७ रोजी दुपारी ४ वाजता बक्षीस वितरण आणि समारोपाच्या कार्यक्रम संपन्न होणार आहे. यासाठी माननीय आमदार डॉ.राहुल आहेर आणि श्री.संतोष बेनमुथा, मालक नवनीत इंटरप्राजेस यांची उपस्थिती लाभणार आहे.

क्रांती ते उत्क्रांती अर्थात मानवी इतिहासातील बदल असा अपेक्षित धरत या विषयानुरूप इमारती निवड करण्यात आल्या आहेत. यामध्ये १०० वर्षातील झालेला बदल अग्रक्रम दिला आहे. त्यानुसार इमारती निवडल्या गेल्या आहेत.

प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या प्रतिकृती खालीलप्रमाणे :

१.अलटेस म्यूझिअम २. सिडने ओप्रा हाऊस ३. द सेंटर

४.बाऊहास देसुआ ५. किंबेल आर्ट म्यूझिअम ६. टॅटलीन टॉवर

७.लोयाल चॅपल ८.चर्च ऑन वॉटर ९.सेंअग्रामस बिल्डींग

१०.गेसाल लायब्ररी ११. वाना वेन्ट‌‌रु हाऊस.

महाविद्यालयात तासिकां आणि पुस्तकांच्या माध्यमातून तर दररोज शिकवले जाते. मात्र पुस्तकांमध्ये शिकलेल्या गोष्टीचे प्रत्यक्ष शिक्षण या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी दाखवत असतात. त्यामुळे हे प्रदर्शन विद्यार्थी आणि महाविद्यालय या दोघांसाठी महत्वाचे असल्याचे संचालक विजय सोहनी सांगतात. तरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिककरांनी आवर्जून यावे असे आवाहन आयडीया कॉलेजकडून करण्यात आले आहे.

प्रदर्शानासाठीच्या प्रतिकृती इमारती बनवताना विद्यार्थी

idea college picture6
idea college picture7
idea college picture4
idea college Picture3
idea college Picture2
idea college Picture1
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.