ylliX - Online Advertising Network

धुळे मनपावर भाजपचा झेंडा; शिवसेनेपेक्षा एमआयएमला जास्त जागा

ड वर्गाच्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारासाठी उतरवलेल्या राज्य सत्ताधारी भाजपला चांगलेच यश मिळाले असून 49 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत आपला झेंडा फडकवला. त्याचवेळी भाजपमधून बाहेर पडून मोठे आव्हान निर्माण केलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पपक्षाचा बर फुसका ठरला असून त्यांना केल्वळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. dhule municipal corporation election 2018 verdict bjp majority

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली होती. तर येत्या लोकसभा आणि विधानसभेसाठी स्वबळाचे नारे देणाऱ्या शिवसेनेला केवळ 2 जागांवर यश मिळाले आहे. शिवसेनेपेक्षा नवख्या असलेल्या एमआयएम पक्षाला मात्र तीन जागांवर यश संपादक करता आले असून द्हारातून प्रथमच त्यांचे निवडून आले आहेत.

जळगाव महापालिकेत विजयाचे शिल्पकार ठरलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन धुळे महापालिकेत विजय मिळवण्यासाठी रोहयो-पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या भाजपच्या तीन मंत्र्यांसह धुळ्यात तळ ठोकून होते. त्यामुळे हे यश संपूर्णपणे त्यांचे असल्याचे बोलले जात आहे.

आता नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असून इव्हीएममध्ये घोटाळा करून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.

असे आहे नव्या मनपा सभागृहातील संख्याबळ

एकूण जागा : 74 : बहुमताचा आकडा 38

भाजप 49

काँग्रेस 5

राष्ट्रवादी 9

एमआयएम 3

शिवसेना 2

समाजवादी पक्ष 2

अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष 1

बसप 1

अपक्ष 2

dhule municipal corporation election 2018 verdict bjp majority
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.