ylliX - Online Advertising Network

गणेश उत्सव : वर्गणीच्या नावे मागितली खंडणी, हातात पडल्या बेड्या

गणेश उत्सव : वर्गणीच्या नावे मागितली खंडणी, हातात पडल्या बेड्या

गणेशोत्सवासाठी जबरदस्ती ११ हजार रुपयांची वर्गणी वसूल करणारे कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार पदाधिकाºयांवर गुन्हा नोंदवला गेला आहे. अंबड पोलिस स्टेशनला त्याबत तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी लगेच कारवाई करत सर्वाना बेड्या ठोकल्या आहेत.

यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार  दिलीप त्र्यंबक वाघ (प्लॉट नंबर एच ११७, अंबड,नाशिक ) औद्योगिक वसाहतीत प्रतिण मशिन टूल्स नावाची कंपनीचे मालक आहेत. या प्रकरणात कामगार क्रांती माथाडी संघटना प्रणित संस्कृत फाऊंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार आहेत, यामध्ये  मंडळाचे पदाधिकारी संशयित अक्षय परदेशी, केतन क्षीरसागर, भगवान घुगे , आबा देशमुख विनापरवानगी कंपनीत  आवारात घुसले होते. तर दमदाटी करत त्यांनी अकरा हजार रुपयांची वर्गणीची मागणी केली . तर तसे न केल्यास  कंपनीत काम होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे .

त्यामुळे घाबरलेल्या वाघ यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यावर पोलिसांनी लगेच कारवाई केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.