मालगाडीचे डब्बे घसरले म्हणून डाऊन असलेल्या अनेक रेल्वे वाहतूक करत असलेल्या गाड्या थांबल्या होत्या. त्यामध्ये नाशिकची असलेली पंचवटी एक्स्प्रेस सुद्धा अडकली होती. मात्र १० वाजेनंतर तिला धीम्या पद्धतीने हलविले गेले आणि इगतपुरी करत पंचवटी अखेर नाशिकला १२ वाजेच्या सुमारास पोहोचली असून आता ती पुढे मनमाड लापोहोचणार आहे. तर इतर गाड्या सुद्धा नियमित झाल्या आहेत.
कसारा नजीक मालगाडीचे डबे घसरले असून त्यामुळे मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. यामध्ये नाशिकला येत असलेल्या पंचवटीतील प्रवासी वर्गाला मोठा फटका पडला आहे. ९.४० मिनिटांनी नाशिकाला येणारी पंचवटी यामध्ये अडकली असून आसनगाव आणि कसारा मध्ये नागरीका अर्थात प्रवासी अडकले आहे. त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. दुसरीकडे रेल्वेने काम युद्धपातळीवर सुरु केले असून त्यामुळे लवकरच मार्ग मोकळा होईल असे सांगितले जात आहे.गर्दीच्या वेळी हा अपघात घडला, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मालगाडीचे घसरलेले डबे रूळावरून हटविण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे, सध्या मध्य रेल्वेची वाहतूक कसाऱ्यापर्यंत न ठेवता आसनगावपर्यंतच सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेन्सचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे नाशिकला येत असलेले अनेक प्रवासी मध्येच अडकले आहेत.त्यामुळे अनेक प्रवासी संतापले आहेत. पंचवटी एक्स्प्रेस आता कसारा येथे आली आहे.
मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. अशा घटना वारंवार घडूनही रेल्वे मंत्रालयाकडून या समस्यांवर ठोस उपाय योजण्यासाठी काहीही पावलं उचलली जात नाहीये. त्यामुळे अजून संताप होतो आहे. येन रात्री कसारा येथे जरी प्रवासी उतरले तरी खासगी रिक्षा आणि गाडीवाले मनाला येईल असे पैसे आकारात आहेत.