ylliX - Online Advertising Network

terrorist Yakub Memon दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवर सजावट

कोविड काळात मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. यावरून वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.terrorist Yakub Memon

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते.

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.

यावरून भाजपा नेते राम कदम यांनी याकुब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हे उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादाने घडतंय की मुंबई प्रेमातून? असा खोचक सवाल कदम यांनी विचारला.terrorist Yakub Memon

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील १२३ पैकी १०० आरोपींना जुलै २००७ मध्ये विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्या. त्यात प्रमुख आरोपी याकूब मेमनसह आरडीएक्स स्फोटके विविध ठिकाणी ठेवणाऱ्या १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २० जणांना जन्मठेप आणि ६० हून अधिक गुन्हेगारांना वेगवेगळ्या शिक्षा ठोठावण्यात आल्या.

टाडा न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असताना फाशीची शिक्षा झालेल्या एका आरोपीसह अनेक आरोपी मरण पावले. फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांपैकी शोएब घन्सार, असगर मुकादम, शाहनवाझ कुरेशी, अब्दुल गनी इस्माईल तुर्क, परवेझ शेख, मोहम्मद इक्बाल मोहम्मद युसूफ शेख, मोहम्मद फारुक पावले, मुश्ताक तरानी, फिरोज मल्की, झाकीर हुसेन, अब्दुल अख्तार खान या १० आरोपींच्या फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च २०१३ रोजी जन्मठेपेत परावर्तित केली. तर केवळ याकूब मेमनचा बॉम्बस्फोटातील सहभाग हा महत्त्वाचा असून त्याने हा कट अमलात आणण्यासाठी आपला भाऊ टायगर मेमनसह पावले टाकली, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला होता.
याकूबच्या कुटुंबातील चार जणांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या, तर तिघांची मुक्तता करण्यात आली होती. एवढय़ा मोठय़ा संख्येने आरोपी असलेल्या आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या या खटल्यात फाशीची शिक्षा अमलात येणारा याकूब मेमन हा एकमेव गुन्हेगार ठरला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.