ylliX - Online Advertising Network

Dead Body विहरीत आढळला विना शीर असलेला अल्पवयीन मुलाचा मृतदेह

पेठेनगर येथे मोठी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अगदी पोलीस ठाण्यापासून जवळचा असलेल्या एका पडीक विहिरीत अज्ञात अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह कुजलेल्या सोबतच अर्धवट अवस्थेत असून शीर नाही, त्यामुळे  पोलिसांपुढे आता या दुर्दैवी  ओळख पटविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. Dead Body

याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली की, सोमवारी  दि.११  दुपारी पेठेनगर येथील रस्त्यालगत असलेल्या एका पडीक विहिरीत अंदाजे १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलाचा अर्धवट मृतदेह पाण्यावर तरंगत दिसला होता.

हा सर्व प्रकार या भागातील वॉचमनच्या लक्षात आला होता.  त्याने तत्काळ याबाबत पोलीस ठाण्याला कळवले होते. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित याबद्दल  स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात पाठविला होता.

पोलिसांनी सध्या फक्त  अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृतदेहाचे शीर नसल्यामुळे सोबतच मृतदेह किमान दोन महिन्यांपासून पाण्यात कुजल्याने ओळख पटविण्याचे मोठे अवघड झाले आहे.

या युवकाच्या मृत्यूमागे घातपाताचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला असून, या मृतदेहाचे हातदेखील नसल्याने कोणीतरी खून करून युवकाला विहिरीत तर फेकून दिले नाही ना? याबाबतही पोलीस तपास करत आहेत. विहिरीत मृतदेह आढळून आल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.Dead Body

*बातमीसाठी वापरलेला फोटो हा फक्त उदाहरण म्हणून घेतला आहे. घटना स्थळाचा याचा काहीही सबंध नाही, याची नोंद घावी.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “Dead Body विहरीत आढळला विना शीर असलेला अल्पवयीन मुलाचा मृतदेह

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.