ylliX - Online Advertising Network

दानवे सत्कार प्रकरण : सुकाणू समितीच्या १७ सदस्यांवर आंदोलनबंदी

दानवे सत्कार प्रकरण : सुकाणू समितीच्या १७ सदस्यांवर आंदोलनबंदी

नाशिक : शेतकरी वर्गला साले म्हणून संबोधलेल्या रावसाहेब दानवे यांचा बेशरमाची फुले देत सुकाणू समिती सत्कार करणार होती. मात्र दानवे नाशिक दौऱ्यावर असतांना पोलीसानी या सर्वाना ताब्यात घेतले होते. आता परत या नेत्यांनी कोणतेही आंदोलन करू नये म्हणून जवळपास १७ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी आंदोलन बंदी घातली आहे.

पोलिसांनी नोटीस देत सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दीर्घ मुदतीचे बंधपत्र का घेतले जाऊ नये, असे नोटीसद्वारे कळविले आहे.

पोलिसांनी दिलेली नोटीस

भाजपा चे नगरसेवक आणि उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या विवाहाच्या निमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आले होते.  आधीच पत्रक काढत सुकाणू समितीचे सतरा कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहावर दानवे यांना ‘बुक्का’ लावून औंक्षण करत काळी शाल व पोशाख देऊन सत्कार करण्यासाठी जमले.  यावेळी पोलिसांनी मुंबई नाका पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्यासह मुंबई नाका पोलिसांचे पथक विश्रामगृहावर दानवे यांच्या आगमनाअगोदरच येऊन पोहचले.

यावेळी आगळ्या अपारंपरिक सत्काराच्या हेतूने एकत्र आलेल्या सुकाणूच्या त्या १७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस उपायुक्त भुजबळ यांनी फौजदारी प्रक्रियेनुसार कलम ११ अन्वये नोटीस दिली असून  १७ कार्यकर्त्यांच्या वर्तनावरून कुठल्याही प्रकारे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संबंधितांकडून सहा महिन्यांच्या दीर्घ मुदतीचे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बंधपत्र का घेतले जाऊ नये? अशी विचारणा नोटीस देत केली असून आंदोलन बंदी घातली आहे. नोटीस बजावून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपर्यंत सार्वजनिक शांततेचा व कायदा सुव्यवस्थेचा कुठल्याही प्रकारे भंग करणाºया आंदोलनापासून लांब राहण्याचा इशारा दिला आहे.

सुकाणू समितीचे सदस्य किसान सभा कार्यद्यक्ष राजू देसले यांची प्रतिक्रिया :

आंदोलन न करता कारवाई होत असेल तर कार्यकर्त्याचा व चळवळचा आवाज दाबणे आहे

“आंदोलन न करता ही कारवाई करणे योग्य नाही. दानवे शेतकरी विरोधी बोलतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. त्यानीं शेतकरी वर्गाचा अपमान करणे बंद करावे या करिता सत्कार होता. त्यानीं स्वीकारला नाही. काल भेटले नाहीत. काल काही भाजप नेते त्यांची भेट ही घालून देणार होते. मात्र आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री 8 वा. पर्यंत मुंबई नाका पोलीस स्टेशन ला ताब्यात ठेवले. व आज acp साहेब यांच्या समोर बोलावलं होते मात्र आज संविधान दिन असल्यामुळे खूप कार्यक्रम ना उपस्थित राहायचे होते म्हणून जाता आले नाही. मात्र दुपारी पोलिसांनी उद्या 11 वा. उपस्थित रहा याची नोटीस बजावली आहे. व 6 महिने आंदोलन करू नये शांतता राखावी या करिता 10 हजार बंध पत्र का घेऊ नये? म्हणणे आहे.”
“गेली 20 वर्ष विद्यार्थी शेतकरी कामगार चळवळत कार्यरत आहे. कधीही पोलीस प्रशासनाने अशी भूमिका घेतली आहे. काल आंदोलन न करता कारवाई होत असेल तर कार्यकर्त्याचा व चळवळचा आवाज दाबणे आहे.चळवळ करणार मी कार्यकर्ता आहे. रोज कायदेशीर परवानगी घेऊन आंदोलन करत असतो. समृद्धी महामार्ग, शेतकरी कर्जमुक्ती सुकाणू आंदोलन चे नेतृत्व करत आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली पोलिसांनी कारवाई करू नये. तर संविधान व राज्यघटना प्रमाणे आंदोलन ना वागणूक मिळावी अन्यथा कार्यकर्ते चळवळ तिल लोकशाही मार्गाने काय करावे ते सांगावे.”
राजू देसले- किसान सभा कार्यद्यक्ष

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.