ylliX - Online Advertising Network

उष्माघाताची लक्षणे त्यावरील करावयाचे उपाय

उष्माघाताने जिल्ह्यात दोन जणाचा मृत्यू  झाला आहे. त्यामुळे उष्माघात होवू नये, झाला तर त्याची लक्षणे कोणती आणि त्यावर कसे उपचार केले जातात ही पुढे दिले आहेत. Dangerous heat wave symptoms treatment medical theory

उष्माघाताची लक्षणं

 • चक्कर येणं
 • प्रचंड डोकेदुखी
 • सुस्ती आणि डोके हलकं झाल्यासारखे वाटणे
 • गरम होत असतानाही घाम न येणं
 • त्वचा लालसर होणं
 • त्वचा गरम आणि कोरडी पडणं
 • स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवणं
 • मळमळणं, उलट्या
 • हृदयाचे ठोके वाढणं
 • जलद गतीने श्वास घेणं
 • गडबडून जाणं
 • आकडी येणं

उपचार काय कराल?

खाली दिलेल्या ६ टप्प्याने रूग्णांवर उपचार करता येऊ शकतात. Dangerous heat wave symptoms treatment medical theory

 • एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास असल्यास तात्काळ त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं
 • वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाला थंड जागेत ठेवावं
 • रूग्णाला आडवं झोपवून पाय थोड्या उंचीपर्यंत वर करावेत. Dangerous heat wave symptoms treatment medical theory
 • रूग्णाला पाणी द्यावं. रुग्ण शुद्धीत असेल तर स्पोर्ट्स किंवा रिहायड्रेशन ड्रिंक्सही उपयुक्त ठरतील
 • रुग्ण बेशुद्ध असेल तर जवळच्या डॉक्टरांकडे नेऊन आयव्ही लावण्याची व्यवस्था करावी
 • आइस पॅक, स्प्रे किंवा थंड पाण्याने रूग्णाच्या शरीराचं तापमान कमी करावं

उष्माघातापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी

 • भरपूर पाणी प्यावं. दररोज किमान ८ ग्लास पाणी प्यायला हवं
 • थंड पाण्याने आंघोळ करा
 • हलक आणि पोषक आहार घ्या. आहारात काकडी, कलिंगड, नारळ या पदार्थांचा समावेश करा.
 • सैल कपडे आणि कॉटनचे कपडे घाला
 • बराच काळ बाहेर रहावं लागणार असेल तर त्वचेवर किंवा कपड्यांवर थोडंसं पाणी शिंपडा
 • सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाहेर पडणं शक्यतो टाळा. जर बाहेर पडणार असाल तर छत्री किंवा टोपीचा वापर करा. Dangerous heat wave symptoms treatment medical theory
 • अतिरिक्त मद्यपान, साखर असलेलं पेयं, कॅफेन जास्त असलेलं पेय टाळा. कारण यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते
 • अतिप्रमाणात व्यायाम आणि अधिक उष्ण काळात बाहेर व्यायाम करणं टाळा
 • लहान मुलं आणि वृद्धांमध्ये डिहायड्रेशनची लक्षणं दिसतात का यावर लक्ष द्या

सावधानता बाळगा : उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू, जिल्ह्यात दुसरा मृत्यू

Dangerous heat wave symptoms treatment medical theory

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.