अपघात मालिका सुरूच असून मनमाड-मालेगाव रोडवर भीषण अपघात झाला असून एका एका परिवारातील चार ठार झाले आहेत. चोंढी घाटात ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात झाला असून अन्य चार जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, अलाहाबाद येतून विवाह समारंभ आटोपून कारने पुण्याकडे परतताना मालेगाव- मनमाड रस्त्यावर चोंढी घाटात ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. त्यात दोन महिला व एका मुलगा-मुलीचा समावेश आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. पुणे येथील रहिवासी असलेले मृत्युंजय सिंग व त्यांचे कुटुंबिय अलाहाबाद विवाह समारंभासाठी गेले, त्यांच्या समवेत नांदेड येथील त्यांचा साडू, त्यांचा परिवार होता. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास मालेगाव-मनमाड रस्त्यावर चोंढी घाटात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकवर इर्टिका ही कार आदळूली आणि चोघाना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात कार चालकाला समोरून येणार्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
अंजुसिंग विजित सिंग परमार (वय २८ रा. नांदेड), शालिनीसिंग मृत्यूंजय सिंग (३०, रा.पुणे), रिद्धीसिंग मृत्यूंजय सिंग (६ रा. पुणे), विरेंद्र विजित सिंग (७ रा. नांदेड) अशी मृताची नावे आहेत. तर, विजितसिंग आणि त्यांचा मुलगा वंश (दीड वर्षे), मृत्यूंजय सिंग आणि त्यांची मुलगी रितसिंग (5) हे चौघे जखमी झाले. जखमीवर सटाणा नाका येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील विजितसिंग त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
विजितसिंग परमार व मृत्यूंजय सिंग हे नात्याने साडू असून ते आपल्या शालकाच्या विवाहसोहळ्यासाठी प्रयागराज (अलाहाबाद) ला गेले होते. लग्न सोहळा आटोपून ते पुणेमार्गे नांदेडला आपल्या कारने (एमएच 11 बीएच 6746)परतत होते.दुपारी मृतांचे नातेवाईक मालेगावी दाखल झाले. तालुका पोलिसांनी पंचनामा करित मृतांची ओळख पटविली. दरम्यान, ट्रकचालक फरार असून पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरुन बाजूला करित वाहतूक सुरळीत केली. तालुका पोलीसात या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.