जिल्ह्यातील धरणे भरत आली शंभर टक्के

जिल्ह्यातील धरणे भरत आली शंभर टक्के

गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यावर जोरदर पर्जन्य वृष्टी सुरु आहे. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पाण्याची पटली वाढत असून म्हणून  धरणांमधून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामध्ये सर्वात आधी  पालखेड धरण समूहातील जवळपास सर्वच  धरणांचा साठा ८० टक्के च्या पुढे गेला  आहे. तर  शहरात संततधारेसह  जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे.

यामध्ये नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण समूहातील सर्व धरणे पूर्ण भरली आहे. त्यामुळे अतिरिक्त असा पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू आहे. यामध्ये जर विचार केला तर  गंगापूर धरणाचा जलसाठा ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जोरदार पाऊस धरण भागात होत असल्याने गोदावरी खोºयावरील गंगापूर धरण समूहात कश्यपी, गौतमी, आळंदी हे तीन मध्यम प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेली धरणे आहेत. या धरणांमध्ये अनुक्रमे प्रत्येकी एक हजार ३८५, १८५६ आणि ९७० दलघफू इतका पाणीसाठा आहे. धरणांची क्षमता लक्षात घेता गंगापूर ९४, तर कश्यपी ९९ टक्के भरले आहे तर उर्वरित गौतमी ९९ आणि आळंदी १०० टक्के भरले आहे.जर असाच पाऊस सुरु राहिला तर धरणातून विसर्ग होत राहणार आहे. नाशिकच्या या विसर्गाचा संपूर्ण फायदा मराठवाड्याला होणार आहे. या आगोदर जवलापास ४५ टी एम सी पाणी औरंगाबादला पोहोचले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.