ylliX - Online Advertising Network

daily state corona report राज्यातील कोरोनाबाधित २१७ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १९८२ झाली आहे.  २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.आतापर्यंत २१७ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.daily state corona report
निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर  शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ३७ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत ३ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशिम मधील आहेत.  याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.daily state corona report
आज राज्यात २२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  त्यात मुंबईचे १६, पुणे येथील ३ तर नवी मुंबईचे २  आणि सोलापूरचा १ रुग्ण आहे.  आज झालेल्या मृत्यूंपैकी  १३ पुरुष तर ९ महिला आहेत.  ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एकजण ४० वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्युमुखी पडलेल्या २२ पैकी २० रुग्णांमध्ये ( ९१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.  यापैकी एकाला मलेरिया देखील होता. daily state corona report
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४९ झाली आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४९ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका १२९८ (मृत्यू ९२)
ठाणे ०६
ठाणे मनपा ४४ (मृत्यू ०३)
नवी मुंबई मनपा ४५ (मृत्यू ०३)
कल्याण डोंबवली मनपा ४६ (मृत्यू ०२)
उल्हासनगर मनपा ०१
भिवंडी निजामपूर मनपा ०१
मीरा भाईंदर मनपा ४२ (मृत्यू ०१)
पालघर ०४ (मृत्यू ०१)
वसई विरार मनपा २१ (मृत्यू ०३)
रायगड ०४
पनवेल मनपा ०८ (मृत्यू ०१)
ठाणे मंडळ एकूण १५२०(मृत्यू १०६)
नाशिक ०२
नाशिक मनपा ०१
मालेगाव मनपा १५ (मृत्यू ०२)
अहमदनगर १०
अहमदनगर मनपा १६
धुळे ०१ (मृत्यू ०१)
धुळे मनपा ००
जळगाव ०१
जळगाव मनपा ०१ (मृत्यू ०१)
नंदूरबार ००
नाशिक मंडळ एकूण ४७ (मृत्यू ०४)
पुणे ०७
पुणे मनपा २३३ (मृत्यू ३०)
पिंपरी चिंचवड मनपा २३
सोलापूर ००
सोलापूर मनपा ०१ (मृत्यु ०१)
सातारा ०६ (मृत्यू ०२)
पुणे मंडळ एकूण २७० (मृत्यू ३३)
कोल्हापूर ०१
कोल्हापूर मनपा ०५
सांगली २६
सांगली मि., कु., मनपा ००
सिंधुदुर्ग ०१
रत्नागिरी ०५ (मृत्यू ०१)
कोल्हापूर मंडळ एकूण ३८(मृत्यू ०१)
औरंगाबाद ०३
औरंगाबाद मनपा १६ (मृत्यू ०१)
जालना ०१
हिंगोली ०१
परभणी ००
परभणी मनपा ००
औरंगाबाद मंडळ एकूण २१ (मृत्यू ०१)
लातूर ००
लातूर मनपा ०८
उस्मानाबाद ०४
बीड ०१
नांदेड ००
नांदेड मनपा ००
लातूर मंडळ एकूण १३
अकोला ००
अकोला मनपा १२
अमरावती ००
अमरावती मनपा ०५ (मृत्यू ०१)
यवतमाळ ०४
बुलढाणा १३ (मृत्यू ०१)
वाशिम ०१
अकोला मंडळ एकूण ३५ (मृत्यू ०२)
नागपूर ०१
नागपूर मनपा २७ (मृत्यू ०१)
वर्धा ००
भंडारा ००
गोंदिया ०१
चंद्रपूर ००
चंद्रपूर मनपा ००
गडचिरोली ००
नागपूर मंडळ एकूण २९(मृत्यू ०१)
इतर राज्ये ०९ (मृत्यू ०१)
एकूण १९८२(मृत्यू १४९)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४८४६ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १७.४६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच घरातील त्यांच्या सहवासातील २६ जण कोरोना बाधित आढळले होते. यातील २४ जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. इस्लामपुरातील या भागात ३१ सर्वेक्षण पथकांनी मागील २ आठवडे साडेसात हजाराहून अधिक लोकसंख्येचे नियमित सर्वेक्षण केले आहे.daily state corona report

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.