ylliX - Online Advertising Network

पालखी मार्ग योजनेत त्र्यंबकेश्वर ते वणी मार्गाचा समावेश करावा

भाजपा नाशिक जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांचे गडकरींना साकडे

नाशिक : पालखी मार्ग योजने अंतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्रात पंढरपूर ते शेगांव हा गजानन महाराज पालखी मार्ग, पंढरपूर ते आळंदी हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पंढरपूर ते देहू हा संत नामदेव महाराज पालखी मार्ग उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या दृष्टीने काही प्रमुख पालखी यात्रांच्या मार्गांवर या योजने अंतर्गत या पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर हा संत निवृत्तीनाथ पालखी मार्गमुंबईतील साई भक्तांसाठी कल्याण- वडपे- इगतपुरी, घोटी, सिन्नर ते शिर्डी असा साई दर्शन पालखी मार्ग पुढील नियोजनात घेण्यात यावा अशी मागणी भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याच बरोबर महाराष्ट्रातील अर्ध शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगीगडावर खान्देशातून, त्र्यंबकेश्वर  वरून येणाऱ्या कावड धारकांच्या सोयीसाठी  सप्तशृंगी पालखी मार्ग हाती घ्यावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

या पालखी मार्गावरून चालताना भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत यासाठी सिमेंटच्या रस्त्यावर गवताचे आवरण असणार आहे. केंद्राच्या पालखी मार्ग योजनेत नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या दृष्टीने महत्वाचे आणि गुजरात, मुंबईतील भाविकांच्या आवश्यकते नुसार या मागण्या करण्यात आल्याची माहिती जाधव त्यांनी दिली आहे.

dadasaheb jadhav bjp

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर नवरात्रानंतर येणार्‍या कोजागिरी पौर्णिमेस उत्सव सजता होतो. चैत्र शुध्द म्हणजेच एप्रिल महिन्यात रामनवमी पासून चैत्रोत्सवास गडावर प्रारंभ होणारा हा उत्सव साधारणत: दहा ते बारा दिवस सुरु राहतो. खान्देशातून कावड घेऊन येणार्‍या भाविकांची मोठी संख्या बघायला मिळते. हे कावड धारक त्र्यंबकेश्वर येथून वणीची जगदंबा आणि सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवीच्या स्नानासाठी तीर्थथक्षेत्रातून तीर्थ आणत असतात. अडीशे किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

मध्यप्रदेश, नंदुरबार, धुळे, नाशिक, मुंबई येथून सप्तशृंगी आईचे भक्त वेगवेगळ्या नद्यांचं तीर्थ कावडात घेऊन पदयात्रा करत गडावर येतात. या कावडातील तीर्थाचे आईला कोजागिरीस रात्री १२ वाजेपर्यंत स्नान घालण्यात येते. हा अभिषेक म्हणजे वेगवेगळ्या नद्यांच्या जलाचा आईच्या पायाशी संगम असतो. या अभिषेकानंतर आई सप्तशृंगीची मोठी पुजा होऊन आरती पार पडते. या सोहळ्याचे साक्षीदार होणं हे मोठ भाग्य असल्याचे भाविकांना वाटते.

 

आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.