नाशिकात आता सायकल शेअरिंग

नाशिक : नाशिक महानगर पालिका आणि टीसीएसच्या डिजिटल इंपॅक्ट स्क्वेअर यांच्या संयुक्त विद्यमाने बोस्टन (अमेरिका) शहराच्या धर्तीवर सायकल शेअरिंग हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

टीसीएसच्या डिजिटल इंपॅक्ट स्क्वेअर संस्थेच्या पेडल नामक संशोधन संघाने ( innovation team ) ने हा आराखडा तयार केला असून महापौर रंजना भानसी यांच्याशी काल डिस्क्यू च्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून उद्या (दि. ७ एप्रिल) आरोग्य दिनाच्या दिवशी टीआय या कंपनीच्या माध्यमातून सहा सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर या सायकलस उपलब्ध करून देण्यात येणार असून नोंदणी केलेल्या वापरकर्त्यांना अर्ध्या तासासाठी १० रुपयांपासून असलेल्या प्लान मध्ये या सायकलस वापरता येणार आहेत. पेडल टीमला नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे मोठे सहकार्य मिळाले.

प्रथम प्रयोगात हा उपल्रम यशस्वी झाल्यास शहरातील इतर भागातही याचे प्रयोजन करण्यात येणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले आहे. मात्र या सायकलस कोणत्या मार्गांवर वापरता येणार आहेत याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसून या सायकल वापरकर्त्यांना रस्ता सुरक्षेची हमी कोण देणार आहे असा प्रश्न विचारला जात आहे.

असा असेल उपक्रम :

 • प्रायोगिक तत्त्वावर सहा सायकल्स उपलब्ध
 • हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सायकलस असतील.
 • ‘टीआय’ कंपनीनतर्फे सहा सायकल्स.
 • सायकलचा वापर करण्यापूर्वी नोंदणी आवश्यक.
 • नोंदणी केलेल्या सदस्यांना डेबिट कार्डच्या धर्तीवर कार्ड दिले जाईल.
 • कार्ड स्वाईप केल्यानंतर सायकलचा वापर करता येणार आहे.
 • नाममात्र शुल्कात सायकल्स उपलब्ध.
 • सायकल्स जीपीएस प्रणालीशी जोडलेल्या असणार.
 • नोंदणीसाठी आधारकार्ड आवश्यक
Share this with your friends and family

You May Also Like

2 thoughts on “नाशिकात आता सायकल शेअरिंग


 1. छान उपक्रम आहे.
  पण सायकलींचा दुरुपयोग होते आहे.
  आता कबीरनगरमधील मुले विनाकारण सायकली घेऊन स्टंटबाजी करत आहेत. यामुळे टायर व ब्रेक चे नुकसान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.