ylliX - Online Advertising Network

युवतीवर तिच्या घरात घुसून युवकाने केले धारदार शस्त्राने वार

एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू युवकाने अल्पवयीन मुलीवर तिच्या घरात घुसून लासलगाव कोटमगाव रस्त्यावरील दत्तनगर येथे धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. ही  घटना आज (ता.६) दुपारच्या वेळी  घडली. आतिश ढगे या माथेफिरू  युवकाने एकतर्फी प्रेमातून  युवतीवर प्राणघातक हल्ला तर केलाच सोबतच त्याने  स्वतःवरही धारदार शस्त्राने वार केले आहेत.  या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास आतिश ढगेने बळजबरी  मुलीच्या घरात प्रवेश केला होता, त्याने घरात घुसतास  अत्यंत निर्दयपणे धारदार शस्त्राने तिच्या  हातापायावर, पोटावर, छातीवर सपासप वार केले आहेत, यामध्ये ती युवती गंभीर जखमी झाली आहे. यावेळी मदतीसाठी  मुलीने जोरदार ओरडत धावा गेल्याने कॉलनीतील नागरिक जमा झाले होते, तेव्हा यावेळी आतिश ढगे याने स्वतःच्या अंगावरही वार केले आहेत. युवतीवर अत्यंत क्रूरपणे अठरा वार केले आहेत. यामुळे मुलीच्या  घरामध्ये अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता.

हा युवक सोबत इतर तीन मुलांना देखील घेऊन आला होता. घटना घडल्यानंतर या तीनही युवकांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि लासलगाव पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले होते. 

हल्ल्यात वापरण्यात आलेले धारधार शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून,  मुलीला लासलगाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे.  तसेच जखमी यूवकाला निफाड येथील रुग्णालयात हलविले असून त्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.