२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’ 

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याची नामी संधी, एकाच छताखाली सर्व पर्याय 

नाशिक –  येत्या २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत गंगापूर रोड येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर ‘क्रेडाई नाशिकप्रॉपर्टी एक्स्पो 2018’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नामवंत प्रकल्पात फलॅट, प्लॉट, फार्म हाऊस, शेतजमिन, बांधकाम साहित्य, गृहकर्ज,आदि सर्वच एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने आपले स्वप्न पूर्ण कण्याची हि नामी संधी असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे व प्रदर्शनाचे समन्वयक अनिल आहेर व सहसमन्वयक ऋषिकेश कोते यांनी दिली.

क्रेडाई हि भारतातील बांधकाम व्यावसायीकांची सर्वोच्च संस्था असून सुमारे ११००० हून अधिक बांधकामव्यावसायीक या संस्थेशी जोडले आहेत. या सदस्यासाठी  क्रेडाई नियमितपणे अनेक ज्ञानसंवर्धनपर कार्यक्रमाचे आयोजन करते. नाशिक हे अनेक अर्थाने आघाडीचे शहर असून नाशिक मधील सुमारे ७२६ बांधकाम प्रकल्प हेरेरा नोंदणीकृत आहेत. आरोग्यसेवा, शिक्षण तसेच आल्हाददायक वातावरण यांनी परिपूर्ण असलेल्या नाशिक मधील विमानतळ देखील आता नियमितरीत्या सुरु आले असून त्यामुळे आगामी कालावधीत नाशिकमध्ये चांगली गुंतवणूक येण्याचीही शक्यता असल्याचेउमेश वानखेडे म्हणाले .

घर हि माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक असून घर बांधणीच्या कामात विकासकाची महत्वाची भुमिका असते. गत वर्षामध्ये  अर्थकारण, विविध शासकीय नियम यामध्ये अनेक बदलझाले. तसेच जीएसटी, रेरा सर्व घटकांच्या अनिश्चिततांना आता पूर्णविराम लाभला आहे.’रेरा’कायद्यामुळे या व्यवसायात आणखी पारदर्शकता आलीअसून सद्यस्थितीत अर्थसहाय्य संस्थांनीही कर्जाचे दर बरेच कमी केले असून कर्जाचा अवधीही वाढवला आहे. तसेच शासनाने सुध्दा पहिले घर खरेदी करण्यासाठी 2.67लाखपर्यंत सुट दिली आहे. एकूणच,सध्या गृहखरेदीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे हे प्रदर्शन गृहखरेदीची महत्वाची संधी ठरणार आहे.

उदाहरण म्हणून नूतन इमारत चित्र !

यावर्षी गणपती, दसरा व दिवाळी या सणांमध्ये नागरीकांनी मागीलवर्षी पेक्षा दुपटीने गृहखरेदीचा मुहुर्त साधला असून यावर्षातील हा गृहखरेदीचा शेवटचा मुहुर्त असल्याने त्याचाही लाभ घ्यावा.अर्थपुरवठा करणा-या नामांकित वित्तीय संस्था, बांधकाम साहित्यातील नामांकित कंपन्या, फूड, अपारंपरिक उर्जा,सेवा पुरविणाऱ्या विविध संस्था आदींचा सहभाग राहणार असून आगामी काळात नाशिकला गुंतवणूक होऊन त्याचा फायदा शहराच्या अर्थकारणास होणार आहे.डोंगरेवसतिगृहाच्या मैदानावर  विस्तीर्ण परिसरात होणाऱ्या प्रदर्शनात १००  हून अधिक बांधकाम व्यावसायिक,1५ पेक्षा जास्त गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था व अन्य बांधकाम साहित्यकंपन्यांचे स्टॉल्स असतील .

प्रदर्शन कालावधीत बुकींग करणा-या 3 भाग्यवंतांना हॅचिको किचन ट्रॉलीतर्फे गिफट व्हाउचर जिंकण्याची संधी मिळणार आहे.प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष सुनील कोतवाल , मा. सचिव कृणाल पाटील, सह समन्वयक ऋषिकेश कोते, उपाध्यक्ष रवी महाजन, अतुल शिंदे, राजेश पिंगळे, नरेंद्र कुलकर्णी, राजेश आहेर  यांच्या समवेत सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत ..

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.