ylliX - Online Advertising Network

मुलाने केली लाकडी दांडक्याने  बापाची हत्या

नाशिक – सिडको परिसारत धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री घरातील भांडणाच्या रागातून एका मुलाने त्यांच्या वडिलांची हत्या केली आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपीला  पोलिसांनी अटक केली आहे.सिडकोतील शिवशक्ति चौकातील अजिंक्य व्हिला रो हाउस परिसारत हत्येची घटना घडली आहे. मुलाने बापाला लाकडी दांडक्याने जबर  मारहाण केली. या मारहाणीत वडील मधुकर तुकाराम बोरगे जबरदस्त जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तुकाराम यांच्यावर त्यांचा मुलगा जॉन बोरगे याने हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी जॉन बोरगे याला अटक केली आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहिती नुसार जॉन हा मानसिक रुग्ण असल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.  मात्र नेमके काय कारण होते हे पोलीस अधिक तपास करत आहेत. या आगोदर सिडको परिसरात तीन हत्या घडल्या आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.