जन्मावर प्रेम करा, निराश होवू नका ,तर संकटावर मात करा – पोलिस आयुक्त

नाशिक पोलिस आयुक्त आयांनी आपल्या विचारातून आजच्या तरुणांना संदेश दिला असून निराश न होता मोठ्या उमेदीने संकटाला सामोरे जा असे ते सांगत आहेत. त्यांचे विचार त्यांच्या शब्दात देत आहोत जरूर वाचावे ! 

के.के.वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणारा,नाशिक पोलिस  आयुक्तालाची 21 कि.मी. मॅरेथॉनची फेसबुकवर ऑनलाईन प्रसिध्दी प्रक्षेपण करणारा संगणक तज्ञ कौशल बाग, वय वर्षे -21 याने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. सदर तरूण हा उत्स्फुर्तपणे पोलीस विभागाला सतत सहकार्य करित होता. तथापि त्याने केलेली अचानक आत्महत्या ही काळजीची बाब असुण, त्यावर एकुणच तरूण मुले/मुली, पालक यांनी साकल्याने विचार करून उपाययोजना केली पाहिजे. असा विचार करून मा. पोलीस आयुक्त श्री. रविंद्र सिंगल यांनी चिंतन करून, पोलिस  विभागाची जबाबदारी ओळखत  तरूण वर्गाला आत्महत्ये पासून  परावृत्त करण्याचे दृष्टीने  आवाहन करणारा चिंतनपर लेख लिहीला आहे. 

या जन्मावर… या जगण्यावर शतदाः प्रेम करावे..!

 

              या  काव्यमय षब्दांमध्ये कवी मंगेश  पाडगावकर यांच्या

गाण्याला अरूण दाते यांनी जेव्हा संगीत  साज दिला त्यातुन भरभरून जीवन जगण्याची खरच उभारी मिळते. कारण सगळया प्राणीमात्रांमध्ये मनुष्य  हा केवळ प्राणी म्हणुन जगत नाही तर, निसर्गाने त्याला उत्क्रंातीच्या माध्यमातुन विकसित विचारशक्ती आणि बुध्दीच बळ दिल. डार्विनच उत्क्रांती वादानुसार मागील 48-48 लाख वर्शांपासुन एप (ंचम) या माकडापासुन आजचा शहाणा, सुसंस्कृत माणुस उत्क्रांत होत आला आहे. अषा या माणसाला भाव-भावना, जगण्यातील संवेदनषीलता, निरागस प्रेम, दया-करूणा, त्याची साहित्य, कलाआविश्कार इत्यादि बाबींच्या माध्यमातुन माणुस एक समृध्द जीवन जगण्याची धडपड सतत करित असतो आणि म्हणुनच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळी अषी सद्सद्विवेक बुध्दीचे वरदान लाभलेला (त्ंजपवदंस ।दपउंस) माणुस म्हणुन उत्क्रांतीच्या टप्प्यावर वरच्या पातळीवर मानला जातो.

                परंतु अविकसित प्राण्यांमध्ये देखिल आत्महत्या करण्याची अनैसर्गिक प्रवृत्ती दिसुन येत नाही. निसर्गक्रमाला अनुसरून प्राणीमात्र त्यांचे जीवन जैविक पातळीवर पुर्णपणे जगतात. तथापि अलौकिक विचार षक्तीचे वरदान लाभलेला माणुस अकाली जीवन संपवणारी आत्महत्या का करतो ? हे अद्याप न उलगडलेल कोड आहे. काल-परवा कौषल योगेष बाघ या 29 वर्शीय संगणक तंत्रज्ञाने केलेली आत्महत्या अषीच मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यामुळे मन क्षणभर सुन्न झाले. पोलीस विभागाला उत्स्फुर्तपणे वेळोवेळी, निश्क्रीय सेवा देणा-या या के.के.वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्ज् क्षेत्रात षिक्षण घेणा-या बुध्दीमान तरूणाने अचानक आपले जीवन का संपवावे ? हा माझ्या मनाला पडलेला प्रष्न आहे.

                तथापि आधुनिक जीवनषैली धावपळीची आणि तणावग्रस्त झालेली असुन त्यावर समाज म्हणुन आपल्याला उपाय षोधलाच पाहिजे. भारतात लोकसंख्येच्या 65 टक्के असलेल्या 35 वर्श वयोगटाच्या आतील असलेल्या तरूणांची, जगात सर्वात मोठी लोकसंख्या म्हणुन आम्ही स्वतःला ‘‘तरूण भारत’’ म्हणुन अभिमान बाळगतो. मात्र त्याचवेळी बेरोजगारी, गरिबी, व्यसनाधिनता, गुन्हेगारी अषा विविध कारणांमुळे आजचा तरूणवर्ग निराष, हताष, दिषाहीन आणि वैफल्यग्रस्त झालेला दिसुन येतो. एकीकडे अमेरिकेत सिलीकॉन व्हॅली आणि जगभर उच्चषिक्षीत तंत्रज्ञ म्हणुन भारतीय तरूणांचा सहभाग वाढत असतांनाच, कौषल बाघ सारखी तरूण मंडळी कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी निराष होवुन आत्महत्या करतात, त्यावेळी आपल्याच काळजाचा तुकडा गेला, अषी भावना होते. दरवर्शी जगात 8 लाख लोक वेगवेगळया कारणांसाठी आत्महत्या करतात, पैकी एकटया भारतात 2 लाख लोक वेगवेगळया कारणांसाठी आत्महत्या करतात.

                खरेतर मानवी जीवन इतके कठोर आणि जगण्यास असहय मानण्याचे कारण नाही. कारण एका निकोप दृश्टिकोनातुन आपण सभोवताली नजर टाकली तर, मानवी जीवन निखळ आनंद देणारी आणि जगाच्या समृध्दीमध्ये भर घालण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी असल्याचे दिसुन येते. निक वुजिसीक नावाचा, हाता-पायांनी संपुर्ण अपंग असलेला ऑस्टेªलियन तरूण परंतु मनाने अभंग असुन, मागील 10 वर्शांपासुन संपुर्ण जगाला, जीवन भरभरून जगण्याची प्रेरणा देत आहे. दोन्ही पाय गमावलेला न्युझिलंडचा एव्हरेस्ट विजेता असलेला, 56 वर्श वयाचा, मार्क इंग्लीस असो किंवा रेल्वे अपघातात पाय गमावलेली, एव्हरेस्ट षिखर विजेती, अर्निमा यांनी जगाला जीवनावर प्रेम करण्याचा संदेषच दिला आहे.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, मनाचा दुबळेपणा हा एकप्रकारे मृत्युच आहे आणि आत्मविष्वासाने जीवनाला सामोरे जाणे ही एकप्रकारीची ताकद आहे. जन्माला येणे आणि मृत्यु या दोन गोश्टिंवर आमचे नियंत्रण नसले तरी या दोन बिंदुंमधील आयुश्य कसे जगावे, हे संपुर्णपणे माणसाच्याच हातात असते. आजदेखिल सिमेवरिल सैनिक मृत्युची कोणतीही भिती न बाळगता, देषासाठी आत्मसमर्पण करण्यास तयार असतात. त्याचप्रमाणे अनेक सामान्य माणसे आंधळी, अपंग, परिस्थितीने गरिब असतांना देखिल किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावुन, जीवन जगण्याचा मुलमंत्र देत असतात. जगात असा एकही माणुस नाही की, ज्याला समस्या, अडचणी नाहीत. किंबहुना समस्या आणि अडचणी यांना समोरे जावे लागत असतांना आमच्यातील तेज, सुप्त क्षमता बाहेर येत असतात. माणसाला अडचणी आणि समस्या असणे हे त्याच्या जिवंतपणाचे प्रतिक असते. मेलेल्या माणसाला कोणत्याही समस्या किंवा अडचणी नसतात. जर्मन तत्वज्ञ फ्रेड्रिक नित्षे असे म्हणाला होता की, जीवन का जगावे हे ज्याला कळले तो जीवन कसे जगावे हे देखिल षोधुन काढतो. डॉ. व्हिक्टर फ्रॅंन्कल या यहुदी मानसोपचार तज्ञाने दाखवुन दिले की, दुस-या महायुध्दाचे दरम्यान जर्मन नाझी छळ-छावणीत केवळ जगण्याची आषा सोडुन दिल्याने आणि जीवनाचा अर्थ न सापडल्याने ब-याच हताष आणि निराष युध्द कैदी, मोठया प्रमाणात मृत्युमुखी पडले होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीत देखिल ‘जीवनाला अर्थ देता येतो.’ किंबहुना अर्थपुर्ण समाजपयोगी जीवन हे निरोगी, दिर्घायुशी आणि आनंदी असते. असे त्यांनी त्यांच्या ‘लोगोथेरेपी’ आणि ‘अर्थपुर्ण जीवनाचा षोध’ या पुस्तकांव्दारे जगाला संदेष दिला आहे.

जगण्यात मौज आहे असे कोणीतरी म्हटलय, या जगात लाखो गरिब परिस्थितीषी झगडत असतात. हजारो रूग्ण जन्म-मृत्युच्या हिंदोळयांवर हेलकावे खात मरणकळा सोसत पण असतात. संघर्श हाच ज्यांच्या जीवनाचा व जगण्याचा मुलमंत्र असे ब्रीद घेवुन जणू षेकडो बालके फुटपाथवर दिवस-रात्र काढत जगत असतात. कोणी अंध, कोणी अपंग रेल्वेमध्ये मरणयातना सोसत पण जगण्याच गाण गातच असतो की, यातुनसुध्दा अषा आत्महत्या करणा-यांना जगण्याची प्रेरणा मिळावी. तसेही या जगात जगतांना पदोपदी मरणाचे सोहळे पाहणारे काय कमी आहेत काय. कोळसा खाणीत काम करणारे मजुर, रूग्णालयांमध्ये दिवस-रात्र रूग्णसेवा देणा-या आया-मावषी, गटारी उपसणारे हात, भटटीत आयुश्य होरपळुन घेणारे हात हे सगळे पाहिले की, जगण्यात मौज आहे हेच सत्य असल्याच जाणवत. आम्हा पोलीस दलातील अधिका-यांना व कर्मचा-यांना तर नेहमीच सगळया भाव-भावना बाजुला ठेवुन सगळया कौटूंबीक सुखांना पारख होत रोजच जीवन जगाव लागत, 24 तासांच घडयाळ कधी 48 अन 72 तासांच होईल हे सांगताच येत नाही! परंतु रोज आमच्यासाठी एक नवा दिवस असतो, एक नवे आव्हानं असत, लोकांच्या, समाजाच्या सुख-दुःखांषी समरस व्हायला आम्हाला आवडत. एक जीगर अंतरात असते, एक तळमळ असते. काम, मोहिम फत्ते झाली की पुन्हा रिलॅक्स नव्हे तर रिचार्ज होत असतो. आम्ही पोलीस दलाचे षुर सैनिक पण, आमच्या बरोबर खांदयाला खांदा लावुन जगणारा, काम करणारा जवान एकदम असा टोकाचा निर्णय घेतो तेव्हा काहीच सुचेनासे होत. वाटत त्यान आपल्याजवळ मन मोकळ केल नाही, त्याच्या सुरक्षेची आम्ही काळजी वाहण्यास सुध्दा कमी होतो काय ? निदान याची जाणीव तरी त्याला होती किंवा नाही ? असे अनेक प्रष्न मनात रूंजी घालतात, सतावतात. मन मोकळ करण्यासाठीच मग ही लेखणी अषी उतरावी लागते. तरीही भिती वाटते मन माझ खरच रितं होईल काय ? या लेखणीतुन कदाचित थोड हलक वाटेलही पण, त्याची आठवण एक साठवण म्हणुन मनाच्या कोप-यात खुणावत राहिलच. तो मदतीचा हात, तो चेहरा आता दिसणार नाही फक्त एक खंत मला खात राहिल की, त्याला मी का नाही षिकवु षकलो. जेव्हा एखादा तरूण आत्महत्या करतो त्यावेळी तो त्याच्या संपुर्ण कुटूंबाला दुःखाच्या खाईत ढकलुन देतो. ज्या आई-वडिलांनी लहानपणापासुन त्याच्या संपुर्ण जडण-घडणीमध्ये आपले आयुश्य पणाला लावलेले असते, त्यांची कोणतीही जाणीव आणि जबाबदारी न ठेवता आई-वडिलांना आयुश्यभरासाठी दुःखी करून जातात. याचा आत्महत्येस प्रवृत्त होणारी मुले अजिबात विचार करित नाहीत असे लक्षात येते. त्यावरून एकप्रकारे आई-वडिलांच्या प्रति ही कृतघ्नता आहे हे तरूण मुलांनी लक्षात घेणे आवष्यक आहे.

            नुकत्याच 10 वी 12 वी च्या परिक्षा सुरू असुन त्यांच्या निकालावर आधारित काही मुले/मुली जीवनाची अखेरची परिक्षा समजुन, आई-वडिलांच्या अतृप्त इच्छा आणि अतिमहत्वाकांक्षेपायी, मुला/मुलींची आवड-निवड, नैसर्गिक कल न पाहता आपल्या मुलांवर लादतात. त्यामुळे कोवळया वयाच्या मुलांवर आई-वडिलांच्या लादलेल्या इच्छांमुळे अनावष्यक ताण येतो आणि त्यामुळे पौगंडावस्थेतील मुले/मुली आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. याचा आई-वडिलांनी साकल्याने विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे खलील जिब्रान म्हणतो, त्यानुसार आपल्या मुलांचे आयुश्य म्हणजे आई-वडिलांना दुस-यांदा जगण्याची संधी मिळालेली नसुन मुलांना त्यांचे आयुश्य त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता, कल यानुसार घडवु देण्याचे स्वातंरय दिले पाहिजे. त्यांना नैसर्गिकपणे उमलु दिले पाहिजे. त्याचप्रमाणे अलिकडे टिव्ही, मोबाईल, सोषल मिडीया या भासमान साधनांवर कुटूंबातील सर्वच घटक अडकुन पडल्यामुळे कौटूंबिक जिव्हाळयाचा संवाद संपलेला आहे. त्यामुळे पालकांनी किमान दिवसातुन एकदा तरी कुटूंबासोबत जेवण घेण्याची सवय लावुन मुला/मुलींषी, त्यांच्या दिवसभरच्या प्रगतीविशयी संवाद साधला पाहिजे. पालकांच्या निरोगी सुसंवादातुन मुला/मुलींची निकोप मानसिक जडण-घडण होते. त्यामुळे मुलांच्या मनावरिल ताण-तणावाचा निचरा होतो. त्याचवेळी मुलांना चांगल्या साहित्याच्या वाचनाची सवय लावुन त्यांच्याषी त्यातील जीवन मुल्यांबाबत चर्चा केली पाहिजे. मुलांच्या मनावर निरोगी, निकोप जीवन मुल्यांचे महत्व बिंबवले पाहिजे.

         कवी मंगेष पाडगावकरांच ते जीवनगाण पण त्याच्या निमीत्ताने सगळयांना सांगु इच्छितो.

         या जगण्यावर, या जन्मावर षतदाः प्रेम करावे. षतदाः प्रेम करावे!

खुप काही विचारायला षिका, खुप काही बघायला षिका, खुप काही करायला षिका, खुप काही अनुभवायला षिका तर जग तुमचेच आहे. इतरांना सुख अन दुःख आपल मानायला षिका जग तुमचेच होईल तुम्ही जगाचे व्हाल. जगण्यासाठी, या जगण्यावर, या जन्मावर षतदाः काय हजार वेळा प्रेम करण्यासाठी तर आपला जन्म झाला आहे.

जीवनात एखादया प्रसंगात अपयष आले किंवा आपली महत्वकांक्षा आणि स्वप्न पुर्ण करतांना अपेक्षित यष मिळाले नाही किंवा एकतर्फी प्रेमभंगातुन अथवा अन्य कोणत्यातरी कारणामुळे कोणी आपल्यास नाकारले याचा अर्थ जीवन संपले असा होत नसुन इतर व्यक्तीमत्वांच्या अस्तित्वाचा आणि अधिकाराचा आदर करित, संपुर्ण जीवनावर प्रेम करित आपण राखेतुन उठुन उभ्या राहिलेल्या फिनीक्स पक्षाप्रमाणे नवीन उमेदीने आणि उभारीने अर्थपुर्ण आयुश्य जगु षकतो. हे तरूण वर्गाने कधीही विसरू नये. जीवन कश्टमय असले तरी निरोगी आणि निकोप, सकारात्मक, आषावादी दृश्टिकोनातुन जीवनाकडे बघितले तर जीवन खरोखर सुंदर असुन आपल्याला प्रत्येकक्षण भरभरून जगतांना जीवनाचा उत्सव साजरा करता आला पाहिजे. हे खालील नमुद कवितेच्या ओळींमधुन प्रतित होेते.

‘सुंदर जीवन जगतांना’

         असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर!

      नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुश्याला दयावे उत्तर!

         नको गुलामी नक्षत्रांची, अन भिती आंधळी ता-यांची,

      आयुश्याला भिडतांनाही चेन करावी स्वप्नांची!

         असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर!

      नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुश्याला दयावे उत्तर!

         पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेतांना!

      हसु असावे ओठांवरती, काळीज काढुन देतांना!

         संकटासही ठणकावुनी सांगावे, ये आता बेहत्तर!

      नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुश्याला दयावे उत्तर!

         करून जावे बरेचकाही दुनियेतुनी या जातांना!

      गहिवर यावा जगास सा-या निरोप षेवटचा घेतांना!

         स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर-कातर!

      नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुश्याला दयावे उत्तर!

—————-  लेखक  पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, नाशिक शहर 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.