गायींना गुंगीचे औषध देत चोरी , प्रकार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न

चोरांना फिल्मीस्टाईल पाठलाग करत पकडले

देवळाली कॅम्प येथील परिसरात पहाटेच्या वेळी रस्त्यावर फिरत असलेल्या मोकाट जनावरांना बेशुद्ध करून नेत असलेल्या तिघांना पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये संशयित आरोपींनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून पेट्रोलिंग गाडीवर या तिघांनी तवेरा गाडी चढवली होती. cow thieves try kill police officers deolali camp

घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. देवळाली कॅम्प पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की, देवळाली कॅम्प परिसारत असलेल्या मस्जिद रोड परिसरात मोकाट जनावरे फिरत असतात. यांनाच लक्ष करत तिघे संशयित गाई, बैल यांना गुंगीचे औषद देत होते. ते त्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले होते. ही जनावरे ती तवेरा गाडीत भरत होते.

हा सर्व प्रकार सुरू असताना पहाटे पोलिसांची गाडी एम एच १५ इए ०१५५ या भागातून जात होती. तेव्हा पोलिसां शंका आली आणि पोलिसानी गाडी तिकडे वळवली होती. हे पाहून या सर्वांनी गाडी घेतली आणि पळ काढला होता.

एक ठिकाणी रस्ता डेड एंड असल्याने त्यांनी गाडी पुन्हा मागे वळवली आणि याच्या मागावर असलेल्या पोलिसांच्या गाडीवर फिल्मी पद्धतीने आदळवली होती. मात्र गाडीचे नुकसान सोडले तर काही हानी झाली नाही.

पोलिसानी इस्माईल अब्बास गाडीवाला (२८, झाडूवाली चाळ, कोळीवाडा परिसर , कल्याण,), इलियास कालीम कुरेशी (३०,कुरेशीनगर, कुर्ला ), कायाज मुतीज डोन (२७, फते मोहम्मद चाळ, बैलबाजार, कल्याण) यांना ताब्यात घेतले आहे. प्राणघातक हल्ला, चोरी करणे, सरकारी कामात अडथला करणे, प्राण्यासोबत क्रूरता करणे अधिनियम १६ नुसार गुन्हे दाखल केले आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/NashikOnWeb

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.