Covid19 Restrictions Nashik दहा दिवसानंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ : पालकमंत्री

नव्या लाटेत उद्योगधंदे बंद पडू नये म्हणून प्रयत्न!

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्‍या लाटेचा धोका बघता जिल्ह्यातील निर्बंध किमान एक आठवडा तरी कायम ठेवत दहा दिवसानंतर पुन्हा आढावा घेण्याचे आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. Covid19 Restrictions Nashik

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आपत्ती निवारण समितीची बैठक झाली. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे करोनाची लागण झाल्याने बैठकीला उपस्थित नव्हते.

भुजबळ यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये महामारीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने जे प्रयत्न केले त्याला सकारात्मक यश मिळाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रेट हा ४१ टक्क्यांवरुन तो आता १.२२ टक्क्यांवर खाली आला आहे.परंतु परिस्थिती नियंत्रणात असली तरी ही अधिक वाढू नये यासाठी म्हणून कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही.

यापुढे लग्न समारंभामध्ये उपस्थितांची तापमान मोजून त्याचबरोबर कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. लग्न समारंभांसाठी फक्त पन्नास जणांना उपस्थितीचीपरवानगी असेल. तसेच आंदोलन वगैरे करताना देखील नियमाचे पालन हे करावेच लागणार आहे.

तिसरी लाट लक्षात घेता प्रशासनाने सर्व प्रकारचे उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून पावले देखील उचलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन लाट आली तर उद्योगधंदे बंद पडू नये व व्यापारचक्र सुरू रहावे या दृष्टिकोनातून प्रशासन पावले टाकत आहेत. परंतु त्यासाठी नागरिकांनी उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनात सहकार्य केले तर त्यावर मात केली जाऊ शकते असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, मनपाचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Covid19 Restrictions Nashik

आम्हाला फेसबुक वर फॉलो करा
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.