Covid19 positive Malegaon Nashik 12 तासात मालेगाव मध्ये 18 कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक : मालेगाव शहर नाशिकचा धारावी स्पाॅट ठरत असून रविवारी १३ नविन करोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. मागील 12 तासात 18 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. मालेगावात करोना बाधितांची संख्या २७ वर पोहचली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. Covid19 positive Malegaon Nashik

नाशिक शहरात तीन, चांदवडमधील १, पिंपळगाव नजीक येथील १, व मालेगावमधील २७ रुग्णांचा समावेश आहे. मालेगावमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर पिंपळगाव नजीकच्या एका रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे.  तसेच मालेगावमधील इतर  तीन कोरोनाबाधित रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

रात्री मालेगावमध्ये जे सात रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, त्यामध्ये एक ७ वर्षांची मुलगी आहे. एक १० वर्षांचा मुलगा, ३८ वर्षांची महिला, एक १७ वर्षाचा मुलगा तर ४० वर्ष वयोगटाचा पुरुष असल्याचे समजते आहे.

नाशिक जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या संशयितांना खासगी रुग्णलायत शिफ्ट करणार असल्याचे समजते. या आधी ज्या रुग्णांना कोरोना झाला त्यांच्या निकटवर्तीयांचा नवीन रुग्णालयात समावेश करण्यात येणार असल्याची प्रशासनाची तयारी आहे.  मालेगावात कोरोनाची लागण झपाट्यानं होत असल्याने आरोग्य विभागाची अतिरिक्त टीम नेमण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Covid19 positive Malegaon Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.