भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे (Human Testing Of Corona Virus Vaccine). भारतात कोरोना विषाणूच्या लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. भारत बायोटेक या कंपनीने ही घोषणा केली. झॅडस कॅडिला या कंपनीलाही लस चाचणीसाठी केंद्राची परवानगी मिळाली आहे. देशात सध्या दोन कंपन्याकडून कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत (Human Testing Of Corona Virus COVAXIN Vaccine).

हि लस तर आपल्या देशाची :
पटनाच्या ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये या लसीची मानवी चाचणी १० जुलैपासून सुरु झाली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक या फार्मा कंपनीने इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) सोबत पार्टनरशीपमध्ये या लसीवर काम सुरु केले आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे वेगळ्या केलेल्या सार्स-कोव्ह-2 (COVID-19) विषाणूंच्या स्ट्रेन्समधून ही लस तयार करण्यात येत आहे.
भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) असं आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली. या लसीची मानवी चाचणी यशस्वी ठरली, तर त्याचा फायदा संपूर्ण जगाला होईल.
भारत बायोटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कृष्णा इला म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की, ही लस SARS-CoV-2 virus या विषाणूवर काम करेल. भारत बायोटेक सुरुवातीला या लसीच्या २०० मिलियन व्हायोल्स बनवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हैदराबादमधील जिनोम व्हॅली येथे ही लस तयार करण्यात आली आहे. प्राण्यांवर संशोधनासाठी ही जागा अत्यंत प्रभावी असल्याचे सांगण्यात येते.
COVAXINTM, India‘s indigenous COVID-19 vaccine by Bharat Biotech is developed in collaboration with the Indian Council of Medical Research (ICMR) – National Institute of Virology (NIV). The indigenous, inactivated vaccine is developed and manufactured in Bharat Biotech‘s BSL-3 (Bio-Safety Level 3) high containment facility.