आयुक्त मुंढेंची माफी, स्टे काळात पाडलेल बांधकाम त्वरित उभारा : उच्च न्यायालायचे आदेश

आयुक्त तुकाराम मुंढे न्यायलयात हजर, न्यायालयात मुंढे यांचा माफीनामा Court stay order Tukaram mundhe apologise built destroyed building

नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये जोरदार अतिक्रमण विरोधी मोहीम सुरु केली आहे. त्याला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहे. यातच मुंढे यांनी अनधिकृत बांधकामे असलेल्या मंगलकार्यालयांवर कारवाई सुरु केली, त्यामुळे त्यांच्या पैकी एक   ग्रीनफिल्ड लॉन्स कोर्टात गेले. कोर्टाने मनपाला दोन दिवसांची कारवाईची स्थगिती दिली होती. मात्र स्थगिती दिल्यानंतरही  ग्रीनफिल्ड लॉन्सचे बांधकाम पाडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाडलेले बांधकाम तत्काळ उभारून देण्याचे आदेश दिले. कोर्टाचे आदेश असतांना ही कारवाई केली म्हणून कोर्टाने हे आदेश दिले आहे. Court stay order Tukaram mundhe apologise built destroyed building

मागील सोमवारी दि.21 रोजी  महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने गंगापूरोडवरील विश्‍वास लॉन्स, ग्रीनफिल्ड लॉन्स, आसाराम आश्रम व गंगाजल नर्सरीचे बांधकाम काढले आहे. मनपाने ही सर्व बांधकामे पूररेषेत असल्याचा ठपका ठेवला असून कारवाई पूर्ण केली.ग्रीनफिल्ड लॉन्सचे बांधकामावर हातोडा पडण्यापूर्वी मालकांनी उच्च न्यायालयाची कारवाईवर  स्थगिती आणली. कोर्टाचे आदेश होते तरीही मनपाने कोणताही विचार आणि  खात्री न करता बांधकाम पाडून टाकले. Court stay order Tukaram mundhe apologise built destroyed building

हा सर्व प्रकार  ऍड. संदीप शिंदे यांनी ही न्यायालयाला निर्देशित केले. या प्रकरणावर शुक्रवारी (दि.25) सुनावणी ठेवत मनपा आयुक्तांना हजर रहा असे सागितले. परंतु, न्यायालयात आयुक्त मुंढे हजर न होता दुपारी 12.20 वाजता केवळ उपायुक्त आर. एम. बहिरम हेच उपस्थित राहिले. त्यावर न्यायालयाने मनपा आयुक्त हजर का राहीले नाहीत? अशी विचारणा केली. दोन तासात आयुक्त हजर झाले नाही तर त्यांच्यावर क्रिमीनल कंटेप्ट दाखल करू, असा इशारा दिला.

कोर्टाने दिलेल्या इशाऱ्यानंतर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे तातडीने हजर झाले आणि दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी सुरू झाली. कोर्टाचा स्थगिती आदेश मानला नाही म्हणून आयुक्त आणि उपायुक्त दोघांनीही न्यायालयाची जाहीर माफी मागितली. पाडलेले बांधकाम पुन्हा बांधून द्या, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. Court stay order Tukaram mundhe apologise built destroyed building

मालमत्ताधारकांनी न्यायालयाच्या स्टे आदेश महापालिकेला दिले असतांना, बांधकाम का पाडण्यात आले असा प्रश्‍न उपस्थित केला असता उपायुक्त बहिरम काहीच उत्तर देता आले नाही. सोमवारी (दि.21) स्थगितीचे आदेश दुपारी 12.30 वाजता व त्यानंतर दोन वेळा स्थगितीचे आदेश दिले होते. त्यावर महापालिकेच्या संबंधितांची प्रत मिळाल्याची स्वाक्षरी आहे. असे असताना बांधकाम पाडल्याचे निदर्शनास आले.

तसेच महापालिकेला देण्यात आलेले पत्रही न्यायालयात वाचून दाखविण्यात आले. त्यावर मनपा प्रशासनाने याबाबत न्यायालयाची माफी मागितली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस. जे. काथावाला व न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली. ग्रीनफिल्ड लॉन्सतर्फे ऍड. संदीप शिंदे यांनी बाजू मांडली आहे. मात्र कथित बांधकाम अतिक्रमन किंवा अनधिकृत नाही किंवा आहे असे कोणतेही आदेश कोर्टाने दिले नाहीत हे विशेष आहे. Court stay order Tukaram mundhe apologise built destroyed building

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi, Name and Place  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Court stay order Tukaram mundhe apologise built destroyed building
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.