ylliX - Online Advertising Network

सिडको : पती पत्नीची विष घेऊन आत्महत्या; सावकारांचा जाच

नाशिक : सिडकोमध्ये राहणाऱ्या पती पत्नीने कर्जामुळे होणाऱ्या सावकारी तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विषारी औषध सेवन करून या दोघांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिट्ठीच्या आधारे अंबड पोलीसांनी पाच सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. couple suicide money lender torture cidco nashik city police ambad

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सिडकोतील अष्टविनायकनगर येथील कमल रेसीडेन्सी मध्ये वासुदेव अंबादास जाधव (38) व संगिता वासुदेव जाधव (34) हे पती पत्नी राहत होते. couple suicide money lender torture cidco nashik city police ambad

वासुदेव हा लेबर कॉन्ट्रक्‍टरचा व्यवसाय करत होता. व्यवसायासाठी त्याने अशोक केदु होळकर, सुनिल पुरकर, राहुल जाधव, प्रविण भाऊ व अमोल सोनवणे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.

पैसे परत घेण्यासाठी या सावकरांकडून वासुदेवकडे तगादा सुरु झाला. सावकरांच्या तगाद्यामुळे संपूर्ण जाधव कुटूंबीय तणावात होते. याच तणावाखाली जाधव पतीपत्नीने आज (दि. 15) दुपारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. couple suicide money lender torture cidco nashik city police ambad

वासुदेव जाधव यांचा आतेभावाने समाधान पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. पंचनामा करतांना पोलिसांना आढळून आलेल्या चिट्ठीत या सावकारांच्या नावे आहेत. वेळोवेळी पैसे परत करूनही खोट्या केसेस दाखल करून मारण्याच्याही धमक्या हे सावकार देत असल्याने आत्महत्या करत असल्याचे जाधव यांनी चिट्ठीत लिहिलेले आढळले आहे.

त्यानुसार अंबड पोलीसांनी या सर्व सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार करीत आहेत.

काही दिवसांपूर्वीच वासुदेव याचा अपघात होवून तो गंभीर जखमी झाला होता. मात्र त्यानंतरही या सावकारांकडून त्याच्याकडे कर्जाच्या रक्‍कमेची मागणी होतच होती.

couple suicide money lender torture cidco nashik city police ambad
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.