ylliX - Online Advertising Network

दुर्दैवी : घरच्या विरोधामुळे प्रेमीयुगलाने केली आत्महत्या

मालेगाव – खडकी गावात घरच्या विरोधामुळे प्रेमीयुगलाने केली आत्महत्या मालेगाव येथील खडकी गावात एका प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज रोजी समोर आला आहे,या प्रकारामुळे खडकी गावात खळबळ उडाली आहे.
खडकी गावात राहणारे राजेंद्र शेळके व सविता अहिरे यांच्यात प्रेमसंबंध होते,सोमवारी सायंकाळी राजेंद्र शेळकेचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला आणि गळफास घेतलेल्या जागेवरून काही अंतरावर असलेल्या एका मक्याचा शेतात सविता अहिरे चा मृतदेह पोलिसांना आढळला,सविताच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाचे पाकीट पोलिसांना मिळाले आहे,पोलिसांच्या  प्राथमिक अंदाज्याप्रमाणे राजेंद्र शेळके याने आधी सविता अहिरे ला विषारी औषध देऊन नंतर स्वतः गळफास घेतला असावा तसेच या प्रेमसंबंधाला घरच्या कडून विरोध असल्यामुळे या प्रेमीयुगलाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
सविता अहिरे च्या परिवाराने मुलाच्या परिवारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांना केली असून गुन्हा दाखल झाल्यानंतरच आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊ असे सांगितले आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.