लाचखोरी भाग १ : शासकीय योजनांमधील लाचखोरी

nashikonweb.com विशेष :

लाचखोरी भाग १ शासकीय योजनांमधील लाचखोरी

नाशिक :लाचखोरी ही समाजाला लागलेली कीड आहे. तर तर शासकीय आणि निमशासकीय स्तरावर ती पसरली आहे. त्यामुळे कोण कशात आणि कोणत्या कामाकरिता लाच मागेल हे सांगणे शक्य नाही.त्यामुळे लाचखोरी नेमक कोण करत किती प्रमाणत होते आणि कोणत्या विभागात अधिक होते, याबातीत महिती सांगणारा ही वृत्तमाला लाचखोरी सुरु करत आहोत. नाशिक ते संपूर्ण महाराष्ट्रातील हा प्रकार आम्ही या सदरातून मांडणार आहोत.

यामध्ये सर्वाधिक नागरिकांची लुट होते ती शासकीय योजना माहिती घेवून त्यातून फायदा करवून घेताना, योजना असते नागरिकांसाठी आणि फायदा घेतात ती मंजूर करवून घेताना अधिकारी. शासनाची अशी एकही योजना उरली नाही ज्यामध्ये लाचखोरी झाली  नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहे, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कितीही काम केले तरी लाच स्विकारणे सुरु आहे. या लेखात  पूर्ण राज्याची आकडेवारी दिली असून हे फक्त शासकीय योजनाबाबत आहे. नाशिक आणि राज्य निहाय महिती पुढील लेखात दर्शवली जाणार आहे.

यामध्ये २०१४ ते २०१७ मार्च पर्यंत कालावधीचा विचार केला तर या साडेतीन वर्षात २०१५ या साली शासकीय योजनात सर्वाधिक लाच स्विकारली गेली आहे. तर यावर्षी २०१७ मध्ये सर्वाधिक कमी अश्या  ६ सापळे रचून लाचखोर पकडले गेले आहे.

जर साला प्रमाणे फक्त शासकीय योजना मधील लाचखोरी पहिली तर –

२०१७ मार्च – ६ सापळे

२०१६ – ५४ सापळे

२०१५ – ८९ (सर्वाधिक या चार वर्षात )

२०१४ – ८५ (दुसरा क्रमांक )

यामध्ये आपण पहिले असता शासकीय योजना जसे की, झोपडपट्टी विकास योजना, आदिवासी योजना, शेती खर्ड्याचे नुकसान भरपाई,दलित वस्ती सुधार योजना , आम आदमी विमा योजना , शालेय पोषण आहार योजना, पाणलोट विकास कार्यक्रम योजना या प्रकारच्या ४३  योजना मध्ये या २०१४ ते २०१७ या वर्षात एकूण असे २३४ प्रकरणात लाच स्विकारली गेली आहे. त्यामुळे योजाना का राबवल्या जात नाहीत हे स्पष्ट होत आहे.

याप्रकारात  पाहिले असता : – चार वर्ष २०१४ ते २०१७ वर्षातील एकूण आकडेवारी

प्रमुख योजनांतील सर्वाधिक लाचखोरी

रोजगार हमी योजना : ४९ प्रकरणे

घरकुल योजना : २६ प्रकरणे

इंदिरा आवास योजना : २५ प्रकरणे

निर्मल भारत योजना : १७ प्रकरणे

पाणी पुरवठा योजना : १० प्रकरणे

ठिबक सिंचन योजना : १० प्रकरणे

वरील प्रमाणे सर्वाधिक या योजनामध्ये लाच स्विकारीली गेली आहे. तर २०१५ साली सर्वाधिक २३ प्ररणात रोजगार हमी योजनेत लाच स्विकारली गेली होती, तर याच वर्षी १६ प्रकरणात लाच स्विकारली गेली होती.

(दिनांक ३० एप्रिल लाचखोरी २ भागात आपण वर्षनिहाय सापळा,अपसंपदा, अन्य भ्रष्टाचार प्रकरणाची माहिती घेणार आहोत. कालावधी २०१० ते २०१७  )

तक्रार येथे नोंदवा :

o   Add:- Anti Corruption Bureau, Above Muncipal Vegitable Market, Near HDFC Bank, Sharanpur Raod, Nashik

o   Tel :-  0253-2578230   Fax:- 2575628

o   Toll Free No. 1064, 9158242424

o   Email :- spacbnasik@mahapolice.gov.in

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.