bytco hospital nashikroad बिटको हॉस्पिटलची भाजपा नगरसेविकेच्या पतीकडून तोडफोड

नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रूग्णालयात भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी तोडफोड केल्याचे वृत्त असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.पोलिसांनी रुग्णालय बंद केले असून सध्या नागरिकांची बाहेर गर्दी झाली आहे.bytco hospital nashikroad

नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती  राजेंद्र  ताजणे यांनी चार चाकी थेट प्रवेशद्वारातून काचेच्या प्रवेशद्वारातून घातली. त्यामुळे सर्वत्र काचांचा खर्च पडला होता.

या घटनेनंतर राजेंद्र ताजने हे तेथून पसार झाले आहेत. ही घटना नाशिक रोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी आले नवीन सेंटरच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात काचांचा खच पडलेला आहे.

नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत मात्र रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची ईनोवा कार मध्ये नेली आणि तोडफोड केली असे सांगितले जात आहे. अद्याप अधिकृत  माहिती मिळू शकलेली नाही.bytco hospital nashikroad

for video click link below

https://www.facebook.com/NashikOnWeb/videos/509909467125661

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.