Corona Room संभाजी स्टेडियम व ठक्कर डोम येथे कोरोना कक्ष कार्यान्वित होणार

नवीन नाशिक येथील संभाजी स्टेडियम व ठक्कर डोम येथे कोरोना कक्ष कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने मा.आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून त्या ठिकाणी विविध प्रकारच्या कामाच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.Corona Room will be operational at Sambhaji Stadium and Thakkar Dome
nmc nashik
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णांना बेडची संख्या अपुरी पडू नये या दृष्टीने मनपाच्या वतीने युद्धपातळीवर कामकाज सुरू असून त्यामध्ये कोरोना कक्षाच्या संख्येत वाढ करून त्यात बेडची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.या पार्श्वभूमीवर नवीन नाशिक संभाजी स्टेडियमच्या जागेत सुमारे २०० रुग्णांची व्यवस्था होईल असे नियोजन करून या कामास गती देऊन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.तसेच ठक्कर डोम येथील कोरोना कक्ष त्वरित सुरू होईल या दृष्टीने पाहणी करून क्रेडाई चे पदाधिकारी सचिन बागड,रवी महाजन,कुणाल पाटील व अनिल आहेर यांच्याशी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी चर्चा केली.यावेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांचे समवेत मा.उपायुक्त मनोज घोडे पाटील, सहाय्यक संचालक नगर रचना अंकुश सोनकांबळे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, चव्हाण की कार्यकारी एस.एम.चव्हाणके, कार्यकारी अभियंता राजू आहेर, घनकचरा व्यवस्थापन संचालिका कल्पना कुटे, विभागीय अधिकारी मयुर पाटील व आदी अधिकारी उपस्थित होते.
नाशिक शहरातील कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शासनाने निश्चित करून दिलेल्या कामांची अंमलबजावणी करून आपण सर्व आपला परिसर कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी पार पाडतील असा विश्वास मा.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला.Corona Room
nashik nmc
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नाशिक शहरातील कोरोना बाबतच्या विचार-विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस मा.जिल्हाधिकारी सुरज मांढरे,मा.मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्यासह मनपाचे सर्व विभाग प्रमुख व खातेप्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत कोमॉर्बिड रुग्णांची निगेटिव्ह व पॉझिटिव्ह लिस्ट तयार करणे,होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारणे, महा कवच ॲप मध्ये त्यांचे नाव दाखल करून घेणे,रुग्णास दररोज फोन करणे, घराला स्टिकर लावणे,प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढवून त्या ठिकाणी संपर्क क्रमांकाची व्यवस्था करणे, प्रतिबंधित क्षेत्रासाठी भाजीपाल्याची व्यवस्था करणे,प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या शासनाच्या निर्देशाचे काटेकोर पालन करणे,पेशंटचा उगम थांबवणे, मुंबई धर्तीवर आयसोलेशन साठी रुग्णांचा स्वतंत्र फॉर्म भरून घेणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे, प्रतिबंधित क्षेत्रातून रूग्ण बाहेर जाणार नाही याबाबत दक्षता घेणे, मनपाची लॅब लवकरात लवकर कार्यान्वित करून त्यात ५००० इतके नमुने तपासले जातील यादृष्टीने उपाययोजना करणे, सेंट्रल बेड सिस्टीम मध्ये खाजगी रुग्णालयांनी त्यांची माहिती वेळोवेळी भरल्या जाईल याबाबत दक्षता घेणे,शासकीय व खाजगी ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत कोरोना बाबतच्या नियमांचे पालन यादृष्टीने दक्षता घेणे आदी विषयांवर या बैठकीत विचार विनिमय झाला.
यावेळी मा.जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मा.आयुक्त कैलास जाधव यांनी या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा केली.तसेच यावेळी बोलताना मा.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले की रुग्णांचा उगम थांबल्याशिवाय कोरोना नियंत्रित होऊ शकत नाही त्यासाठी विचार विनिमय बैठकीत झालेल्या मुद्द्यांवर सगळ्यांनी दक्ष राहून काम केल्यास शहरातील कोरोना समूळ नष्ट होण्यास मदत होईल त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी झटत राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.Corona Room
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.