नाशिक : गोविंदनगरमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील पाच पैकी चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल अद्याप प्रलंबित असून हा अहवाल आज सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. Corona Positive Relatives Report
प्रशासनाकडून गोविंदनगर केंद्रस्थानी ठेवत आजूबाजुचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून कोरोना बाधित रुग्णाच्या घरातील सदस्यांना कोरोना संसर्ग झाला नाही ना हि तपासणी करण्यात आली. मात्र घरातील नातेवाईकांची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा नाशिककरांना मिळाला आहे.
हा रुग्ण कोणकोणत्या ठिकाणी जाऊन आला होता. याठिकाणी हा परिसर सील करून माहिती घेतली जात आहे. परिसर निर्जंतुक करण्याचे काम सुरु आहे. प्रशासनाकडून जवळपास दहा हजार लोकसंख्येचा हा परिसर तपासला जात आहे, यादरम्यान, संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांचे स्वॅब घेतले जात आहेत.
या रुग्णाच्या एकूण १९ नातेवाईक आणि निकटवर्तीयांचे नमुने घेण्यात आले आहेत. यातील घरातील पाच जणांचा समावेश होता. यामध्ये जवळपास ४ अहवाल आज प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून प्रलंबित आहे. या अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
गोविंद नगर परिसरात एकूण चार मोठे हॉस्पिटल असून ते बंद करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात महापालिकेच्या वतीने फवारणी मोहीम सुरु आहे, नागरिकांना घराबाहेर न पडण्याची तंबी देण्यात आली आहे. Corona Positive Relatives Report
हा रुग्ण दिल्लीला जाऊन आल्यामुळे याचा शोध घेता आला. त्यामुळे नाशिकमध्ये अजूनही दिल्लीहून जाऊन आलेले नागरिक असतील तर त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.