home quarantine कोरोना रूग्णांना गृहविलगीकरणास परवानगी न देता थेट रूग्णालयात दाखल करावे- पालकमंत्री

कोरोना रुग्णांना गृहविलीगिकरणास परवानगी न देता थेट रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे. तसेच ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.Corona patients should be admitted directly to the hospital without permission for home quarantine- Guardian Minister

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, उपअभियंता उमेश देशमुख, गटविकास अधिकारी संदीप कराड, उन्मेष देशमुख,  कृषिविकास अधिकारी रमेश शिंदे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.home quarantine

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ऑक्सिजन प्लँट त्वरित कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

खतांचा पुरवठा वेळेवर करा
खतांच्या वाटपाबाबत शेतकऱ्यांना दैनंदिन माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच खतांचा साठा मुबलक प्रमाणात असून शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे, असे यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

अपघातग्रस्तांना मदतीचे वाटप
येवला तालुक्यात वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदतीचे वाटप यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धनादेशाद्वारे  करण्यात आले.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान
कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या अंत्यविधी व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणाऱ्या निफाड तालुक्यातील युवकांचा सन्मान करून त्यांचे यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी अभिनंदन केले.home quarantine


वृत्त क्रमांक 2 .

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय नाशिक यांच्यामार्फत सन 2020-21 या वर्षाकरीता शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यानी 10 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, संजय आरणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार सदर शिष्यवृत्ती मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील इयत्ता 10वी, 12 वी व वैद्यकीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील 60 टक्के व अधिक गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना गुणवत्तेनुसार व उपलब्ध निधीनुसार देण्यात येते.

शिष्यवृतीसाठी अर्ज सादर करतांना अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र इत्यादी व आवश्यक कागदपत्रे दोन प्रतीत जोडणे आवश्यक आहे. परिपूर्ण अर्ज विहित मुदतीत जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय नाशिक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नासर्डी पुलाजवळ नाशिक पुणे रोड नाशिक या पत्यावर पाठवावेत. अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक 0253-2236081 यावर संपर्क साधावा असे जिल्हा व्यवस्थापक संजय आरणे यांनी कळविले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.