नाशिक : मालेगाव शहर धारावीच्या वाटेवर असून करोना संसर्गाचे हाॅटस्पाॅट ठरत आहे. या पार्श्वभुमीवर मालेगावची जबाबदारी पंकज आशिया यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी लाॅकडाउन अंमलबजावणीत हलगर्जी बाळगल्याप्रकरणी दोन पोलिस उपअधिक्षकांना कारणे दाखवा नोटिस बजावल्या आहेत. Corona Malegaon Update Covid19
देशासह राज्यात करोनाचा गुणाकार दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मालेगावमध्येही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. मालेगाव करोनाचा संसर्ग वाढत असून हॉटस्पॉट बनले आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पंकज आशिया यांच्यावर दिली आहे. त्यांनी देखील अॅक्शन मोडमध्ये येत करोनाचा संसर्ग टाळण्यासाठि उपाय योजना सुरु केल्या आहेत. तसेच 2 पोलीस उपाधीक्षकांना नोटिसा देऊन दणका दिलाय.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या पोलीस अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तसंच या अधिकाऱ्यांना दिली कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली.
शहरात संचारबंदी लागू असूनही नागरिक रस्त्यावर फिरतायत तरी कसे? असा प्रश्न नोटीसमधून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे. २४ तासात खुलासा मागवला आहे. अन्यथा या दोन्ही पोलीस उपाधिक्षकांना शिस्तभंगाच्या कारवाई होऊ शकते. Corona Malegaon Update Covid19