Corona कोरोना वाढ चिंताजनक अमेरिकेतून परतलेला तरुण पॉझिटिव्ह

नाशिकमधील कोरोना वाढ चिंताजनक ‘नाशिक शहरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. सोमवारी  संध्याकाळपर्यत  जिल्ह्यात एकूण १६30  पॉझिटिव्ह कोरोना बाधित रुग्ण आहे. यात मालेगावात १७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह दाखल झाले आहेत. यामुळे आता नाशिक शहर ४47 नाशिक ग्रामीण २६५, मालेगाव ८५० अशी रुग्ण संख्या झाली आहे. यापैकी १०६६ रुग्ण बरे झाले असून ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी शहरात  रविवारी रात्री  उशीरा एकाच वेळी ३७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकाच दिवशी तब्बल ६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. त्यामुळे नाशिककराची  चिंता वाढली आहे.

नाशिक शहरात रविवारी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांपैकी भाभानगरमधील उत्कर्ष कॉलनीतील 22 वर्षीय तरुण 31 मेस अमेरिकेहून आल्यानंतर त्याला शहरातील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते.

तर, जुने नाशिक भागातील कोकणीपुरा, फुले मार्केट येथील 28 वर्षीय युवक, त्र्यंबक दरवाजा, दूध बाजार येथील 27 वर्षीय युवती, खतीब बंगलो, दारुसलाम कॉलनी येथील एकाच कुटुंबातील 25 आणि 27 वर्षीय युवक, टाकळी रोड परिसरातील चक्रधर सोसायटीतील एकाच कुटुंबातील 34 वर्षीय रुग्णासह आठवर्षीय मुलगी, 56 वर्षीय व 29 वर्षीय महिला असे चौघे, गोविंदनगरमधील जयश्री निवास येथील 39 वर्षीय रुग्ण आणि टाकळी रोडच्या काठे मळ्यातील 30 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बातमितील फोटो हा विषयानुरूप लावला आहे.

कोरोना संकट अजूनही आहे. कळजी घ्या विनाकामाचे बाहेर पडू नका ,

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.