Corona Crisis Tablighi Nashik तबलिकिंनी माहिती लपविल्यास गुन्हे दाखल करणार

जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

नाशिक : तबलिकिच्या धार्मिक सोहळ्यास जिल्ह्यातील जे लोक गेले असतील त्यांनी स्व:ताहून जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला याबाबत माहिती द्यावी. तसेच जे लोक तबलिकींच्या संपर्कात आले असतील त्यांनी देखील प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे. माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास करोना संसर्ग पसरविल्या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. Corona Crisis Tablighi Nashik

करोना व्हायरस तिसर्‍या टप्प्यात असून त्याचि प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत. लाॅकडाऊनमध्ये जिल्हा व आरोग्य प्रशासन यांच्या उपाय योजना व नाशिककरांनी केलेले सहकार्य यामुळे जिल्ह्यात करोना बाधित एकच रुग्ण असून संसर्गाची साखळी तोडण्यात यश आले आहे.

मात्र, तबलिकिच्या दिल्ली येथे झालेल्या धार्मिक सोहळयात सहभागी झालेले लोकांमुळे देशभरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातूनही तबलिकि दिल्लीला गेले होते. ते जिल्ह्यात परतले असून त्यांच्यामुळे करोना संसर्ग पसरण्याची भिती आहे.

जिल्हा प्रशासनाने ३२ तबलिकिंची अोळख पटवली आहे. त्यातील १६ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. इतर तबलकिंचा प्रशासन शोध घेत आहे.

मात्र, जिल्ह्यातून दिल्लीला तबलिकीच्या सोहळयास गेलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यांचा शोध घेणे व ओळख पटविणे सुरु असून त्यात प्रशासनाचा वेळ जात आहे.

तबलिकी लोकांमध्ये मिसळल्यामुळे अनेकांना करोना संसर्ग होण्याची भिती असून रुग्णांची संख्येत भर पडू शकते. त्यामुळे तबलिकिंनी स्व:ताहून प्रशासनाला माहिती दयावी. जेणेकरुन प्रशासन वेळीच अशांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. Corona Crisis Tablighi Nashik

या नंबरवर द्या माहिती

तबलिकिंची माहिती गोळा करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी रवींद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टीम नियुक्त केली आहे. तबलिकिनी व त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी या टीमकडे माहिती द्यावी. त्यासाठी ९८३३३८९९९९ यानंबरवर संपर्क साधावा.

इथे बघा नेमकं काय म्हणालेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.