एका महिलेसोबत विचित्र अवस्थेत काढलेले फोटो एका ठेकेदाराच्या चांगलेच अंगाशी आले होते. ज्या लोकांनी फोटो काढत व्हिडियो बनवला ते ठेकेदाराला २०१५ सालापासून धमकी देत खंडणीचे पैसे उकळत होते. यावर पोलिसांत फिर्याद दाखल होताच पोलिसांनी या सर्वाना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चांदवड येथील पाथरशेंबे परिसरातील सरकारी ठेकेदार राजेंद्र ऊर्फ अण्णा काळू ठाकरे यांचे एका महिलेसमवेत अश्लील व्हिडिओ क्लिप बनवण्यात आली होती. पाथरशेंबे येथील सरकारी ठेकेदार राजेंद्र ठाकरे यांना श्रीमती तारामतीबाई प्रकाश मोरे (६०), रजनी प्रकाश मोरे (२७), श्रीमलंग प्रकाश मोरे (३२), सूरज प्रकाश मोरे (३५), नवनाथ प्रकाश मोरे (२१, सर्व रा. पाथरशेंबे ता. चांदवड) हे सर्व ही क्लिप दाखवून खंडणी मागत होते.
यापैकी दोन जणांना ५० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना चांदवड पोलिसांनी अटक केली होती. तर इतर पाच जणांविरुद्ध चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यापैकी अटक असलेल्या दोघांना दोन दिवसाची कोठडी दिली आहे.
या प्रकरणात फोटो व व्हिडिओ क्लिपद्वारे समाजात बदनामी करण्याची धमकी दिली अजात होती आणि वेळोवेळी चेकद्वारे रोख असे अनेकदा पैसे काढून घेतले आहेत. या सर्व लोकांनी २२ जानेवारी रोजी एक लाख रुपयांची मागणी केली असता दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना चांदवड बसस्थानकासमोरील श्रीश्रीमाळ यांच्या महावीर ट्रेडर्स या दुकानासमोर चांदवड पोलिसांनी श्रीमलंग प्रकाश मोरे व नवनाथ प्रकाश मोरे या दोघांना रंगेहाथ पकडले आहे.याबाबत राजेंद्र ठाकरे यांनी चांदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.